घरताज्या घडामोडीलष्कराचे श्वान घेणार कोरोना रुग्णांचा शोध

लष्कराचे श्वान घेणार कोरोना रुग्णांचा शोध

Subscribe

देशात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढत असला तरी कोरोना अजूही संपूर्णपणे गेलेला नाही. याच पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून श्वानांना खास प्रशिक्षण देण्यात आले असून व्यक्ती कोरोनाग्रस्त आहे की नाही ते शोधून काढण्याचे काम हे श्वान करणार आहेत. संबंधित व्यक्तीच्या घामाच्या आणि मूत्राच्या नमुन्यातून श्वान कोरोना रुग्णाला अचूक हुडकून काढणार आहेत.

भारतीय लष्करातील लॅब्रेडोर आणि स्वदेशी जातीच्या श्वानांची यासाठी निवड करण्यात आली आहे. श्वानांची घाणेंद्रीय संवेदनशील असतात. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठीही पोलीस अशा श्वानांचा उपयोग करतात. यासाठी श्वानांना खास प्रशिक्षण देण्यात येते. श्वानांमधील याच गुणांचा वापर लष्कर कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी करत आहे. यासाठी लष्कराचे एक युनिट तयार करण्यात आले आहे. यातील दोन श्वानांनी आतापर्यंत ३, ००० कोरोना संशयितांचे नमुने सुंघले असून त्यातील १८ जण पॉझिटिव्ह असल्याचे श्वानांनी हुडकून काढले आहे.

- Advertisement -

मात्र या चाचणी आधी सर्व नमुन्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. यामुळे हे श्वानांना त्यातून संसर्ग होत नाहीच. तसेच निर्जंतुकीकरणामुळे हे नमुने केवळ कोरोना व्हायरसचे प्रतिरुप असतात, असे लष्करातर्फे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची नोंदणी १ मार्चपासून सुरू होणार – राजेश टोपे

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -