घरदेश-विदेशआता परदेशी पर्यटक थेट जाऊ शकतात अंदान निकोबारला

आता परदेशी पर्यटक थेट जाऊ शकतात अंदान निकोबारला

Subscribe

अंदमान- निकोबारला जाण्यासाठी करण्यात आलेला हा बदल ३१ डिसेंबर २०१८पासून लागू करण्यात आला आहे. अंदमान-निकोबार या ठिकाणी खास पोलीस यंत्रणाही नेमण्यात येणार आहे

आता परदेशी पर्यटक थेट अंदमान- निकोबारला जाऊ शकणार आहे. पोर्ट ब्लेअर विमानतळाला इमिग्रेशन चेकपोस्ट म्हणून सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे परदेशी पर्यटक अंदमानला प्रवेश करुन शकतील तर अंदमानमधून पुन्हा देशात परतण्यासाठी भारतातून जाता येईल. योग्य कागदपत्रे दाखवून तुम्हाला परतीचा प्रवास करता येणार आहे.

आजपासून लागू झाला बदल

अंदमान- निकोबारला जाण्यासाठी करण्यात आलेला हा बदल ३१ डिसेंबर २०१८पासून लागू करण्यात आला आहे. अंदमान-निकोबार या ठिकाणी खास पोलीस यंत्रणाही नेमण्यात येणार आहे. यापूर्वी अंदमान -निकोबारला जाण्यासाठी भारतातून इमिग्रेशनची मान्यता घेऊन जावे लागत होते. पण आता थेट अंदमानला जाण्यासाठी परदेशी पर्यटक पोर्ट ब्लेअरला जाऊ शकतात.अंदमान निकोबार हा केंद्रशासित प्रदेश आहे आणि गृहमंत्र्याच्या आख्यत्यारित तो येतो. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासाठी परदेशी पर्यटकांना नियम अधिक होते. आता परदेशी पर्यटक योग्य ती कागदपत्रे दाखवून अंदमान-निकोबारला जाऊ शकतात.

- Advertisement -
अमाप सृष्टिसौंदर्याचे लेणे अंदमान

अंदमान-निकोबारला अधिक पसंती

२०१५ ते ऑक्टोबर २०१८ पर्यंत अंदमान-निकोबार बेटाला तब्बल १६ लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. यात परदेशी पर्यटकांचा आकडाही मोठाच आहे. नोव्हेंबर महिन्यात जॉन चाऊ या अमेरिकेन पर्यटकाचा खून येथील आदिवासी लोकांनी केला होता. त्यानंतर हे ठिकाण अधिक प्रकाशझोतात आले होते. येथील संस्कृती आणि कलांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने अंदमान-निकोबारला येतात.

बाण मारलेला अमेरिकन पर्यटक एकटा नव्हता – पोलीस

काहीच दिवसांपूर्वी बदलली बेटांची नावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच दिवसांपूर्वी येथील बेटांची नावे बदलली होती. येथील रोस बेटाला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ हे नाव देण्यात आले. नील बेटाला ‘शहीद द्वीप’ आणि हॅवॉक बेटाला स्वराजदीप असे नाव देण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -