घरदेश-विदेशCOVID19 Vaccine: Pfizer लसीला लवकरच भारत सरकारकडून मिळणार मंजूरी; अंतिम टप्प्यात प्रक्रिया

COVID19 Vaccine: Pfizer लसीला लवकरच भारत सरकारकडून मिळणार मंजूरी; अंतिम टप्प्यात प्रक्रिया

Subscribe

भारतात अमेरिकन कंपनी फायझरच्या कोरोना लसीला लवकरच मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीने म्हटले की, भारत सरकारबरोबरची आमची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी असे सांगितले की, कंपनी लवकरच सरकारशी अंतिम करार करणार, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, अल्बर्ट बोरला यांनी फायझर इंडियाच्या कर्मचार्‍यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, भारतातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल आम्हाला मनापासून चिंता आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांसोबत आणि सर्व भारतीय लोकांसह आहोत. फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की, या रोगाविरूद्धच्या भारताच्या लढाईत भागीदार होण्याचा आमचा संकल्प आहे आणि आमच्या कंपनीच्या इतिहासामधील सर्वात मोठा दिलासा देण्यासाठी वेगाने कार्य करीत आहोत.

सध्या भारतात ३ लसीला मंजूरी

भारतात सध्या आपत्कालीन वापरासाठी केवळ तीन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. यापैकी भारत सरकारने सीरमची कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीला मान्यता दिली होती. यानंतर भारताने आपत्कालीन वापरासाठी रशियन कोरोना लस स्पुतनिक व्हीलाही मान्यता दिली. मात्र आता जर फायझर लसीला मंजुरी मिळाली तर ती भारतात दिली जाणारी चौथी लस ठरणार आहे.

- Advertisement -

डॉन वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए) यांच्यात सोमवारी फायझर-बायोटेक लसच्या १.३ कोटी डोसच्या पुरवठ्याबाबत एक करार झाला आहे. फायझऱ पाकिस्तानचे देश प्रबंधक सय्यद मोहम्मद वाजिहुद्दीन यांनी एका निवेदनात म्हटले, पाकिस्तान सरकारसह काम केल्याबद्दल आम्हाला सन्मान वाटतो. कोविड -१९ लस लवकरात लवकर पाकिस्तानी लोकांपर्यंत पोहचविण्याचं आमचं उद्दीष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


रेमडेसिवीर इंजेक्शन घेणं रुग्णांना पडले भारी, वाढतोय राग आणि चिडचिडेपणा

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -