घरदेश-विदेशदिल्लीत जाताना कोरोना निगेटिव्ह बंधनकारक, 'या' राज्यासाठी नियम लागू

दिल्लीत जाताना कोरोना निगेटिव्ह बंधनकारक, ‘या’ राज्यासाठी नियम लागू

Subscribe

'या' पाच राज्यातील नागरिकांना दिल्ली सरकारची नवी नियमावली

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढतेय. यापार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेश, छत्तीसगड, पंजाब या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच दिल्लीत प्रवेश देण्याचा निर्णय केजरीवाल सरकराने घेतला आहे. महाराष्ट्रासह, केरळ, मध्यप्रदेश व इतर राज्यांमध्ये कोरोना प्रसार वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये परिस्थिती पुन्हा चिंताजनक बनत आहे. यामुळे दिल्ली सरकारने खबरदारीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीत प्रवेश करताना कोरोना निगेटिव्ह RT-PCR दाखवणे गरजेचे असणार आहेत. २६ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून, १५ मार्चपर्यंत हे लागू असणार आहे. त्याचप्रमाणे या पाच राज्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांनीही जाहीर केले की, दिल्लीत जाण्यासाठी ७२ तासांपूर्वीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्यानंतरच प्रवास करु शकतात. हा निर्णय रेल्वे, बस, विमान या सर्व वाहतूक प्रवासासाठी लागू असणार आहे.

दिल्लीत 6,38,028 नागरिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. तर १०.९०१ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या दिल्लीत १०४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर १.२० कोटी नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आली. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मागील २४ तासांतील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ७४२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून समोर आले आहे. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा- प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स कार अपघातात गंभीर जखमी

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -