घरदेश-विदेश'आता मोदींनी देशाची माफी मागावी'; चिनी सैन्य माघारी परतताच काँग्रेसची मागणी

‘आता मोदींनी देशाची माफी मागावी’; चिनी सैन्य माघारी परतताच काँग्रेसची मागणी

Subscribe

पंतप्रधानांच्या विधानाचा चीनने क्लिन चीट म्हणून वापर केला, हे दुर्दैवी.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या भारत-चीन सैन्यांतील हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा तणाव कमी करण्यासाठी अनेक बैठका झाल्या. अखेर चर्चेअंती तणाव निवळवण्याच्या दिशेनं सोमवारी पावलं पडली. चीननं सैन्य माघारी घेण्यास सुरूवात केली आहे. चीनकडून सैन्य माघारी घेण्याच्या निर्णयानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षिय बैठकीत भारताच्या हद्दीत कोणीही घुसलेलं नाही, असं विधान केलं होतं.

पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून रोजी भारत-चीन सैन्यांत हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. चीनच्याही सैनिकांचा मृत्यू झाला. या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं. हा तणाव निवाळण्यासाठी लष्कर तसंच राजकीय पातळीवर चर्चा करण्यात आल्या. चर्चेअंती चीननं पीपी १४ येथून सैन्य माघारी घेण्यास सुरूवात केली. त्यानंतर लगेचच काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली. “पंतप्रधानांनी समोर येऊन राष्ट्राला संबोधित केलं पाहिजे. देशाला विश्वासात घ्यावं आणि देशाची माफी मागावी. त्यांनी असं म्हणायला हवं की, मी चुकलो असून मी तुमची दिशाभूल केली. किंवा मला वेगळे शब्द वापरायचे होते, पण मी चुकीचं बोललो,” अशी पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – निष्क्रीय मुख्यमंत्री मातोश्रीबाहेर पडतच नाही; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार


चीनच्या सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आमच्या शूर जवानांनी चिनी सैन्याला परतवून लावण्याचा प्रयत्न केला आणि आपण आनंदानं पाहत आहोत की, लष्कर त्यात यशस्वी झाल्याचं रिपोर्ट सांगत आहेत. आपल्याला लष्कराचा अभिमान आहे. आपल्या सैन्याच्या क्षमतेबद्दल कधीही शंका नव्हती. यापूर्वी सैन्यानं हे काम केलं होतं, मग तो पाकिस्तान असो की चीन. आपल्या सैन्याला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असं पवन खेरा म्हणाले. यावेळी खेरा यांनी गलवान खोऱ्यातील सीमाप्रश्नी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीचा हवाला दिला. “पंतप्रधानांनी केलेलं ते विधान दुर्दैवी होतं. दोन तासाच्या आत चीननं ते विधान भारताच्या पंतप्रधानांनी क्लिन चीट दिली म्हणून चालवलं. पंतप्रधानांच्या विधानाचा चीनने क्लिन चीट म्हणून वापर केला. हे संपूर्ण जग पाहत होतं,” असं देखील खेरा म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -