नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीत 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी सहभाग नोंदविला होता. या शिखर परिषदेनंतर आता कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता बैठकीनंतर देशातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे असा सल्ला दिला आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये देशातील महागाईसह इतर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.(Now Modi should pay attention to the issues in the country Advice from Mallikarjun Kharge)
जी-20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताने भूषवत दोन दिवस बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या शिखर परिषदेमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह ब्राझिल, बांगलादेश आणि ब्रिटनच्याही पंतप्रधानानी हजरे लावली होती. या विदेशी पाहुण्यांची खाण्याची आणि राहण्याच्या व्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारवर टीकाही केली होती. तर 10 सप्टेंबर रोजी भारताने ब्राझिलकडे जी-20 चे अध्यक्षपद सोपवून या परिषदेच्या समारोपाची घोषणा केली होती. यादरम्यान आज कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांना उद्देशून ट्वीट केले असून, त्यामध्ये त्यांनी आता या प्रश्नांकडे लक्ष द्या असा सल्ला दिला आहे.
काय आहे खर्गेंच्या ट्वीटमध्ये?
कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आता जी-20 बैठक संपली आहे, तेव्हा मोदी सरकारने देशांतर्गत समस्यांकडे आपले लक्ष वळवले पाहिजे असा सल्ला दिला आहे.
अब जब G-20 की बैठक ख़त्म हो गई है, मोदी सरकार को घरेलु मुद्दों पर अपना ध्यान आकर्षित करना चाहिए।
🔹महँगाई : अगस्त में एक आम खाने की थाली का दाम 24% बढ़ गया है।
🔹बेरोज़गारी: देश में बेरोज़गारी दर 8% है। युवाओं का भविष्य अंधकारमय है।
🔹घोटाले: मोदी सरकार के कुशासन में…
— Mallikarjun Kharge (@kharge) September 11, 2023
या प्रश्नांकडे लक्ष देण्याची केली मागणी
मल्लिकार्जुन खर्गे यांनी देशातील विविध प्रश्न उपस्थित करीत पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये त्यांनी महागाईचा उल्लेख करत ऑगस्टमध्ये खाद्यपदार्थाच्या सर्वसामान्य थाळीच्या किमतीत 24% वाढ झाल्याचे नमुद केले आहे. तर दुसरा प्रश्न म्हजे बेरोजगारी. त्याविषयी त्यांनी म्हटले आहे की, देशातील बेरोजगारीचा दर 8% आहे. तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले असल्याचेही ते म्हणाले.
हेही वाचा : भारत अनेक मोठ्या देशांना टाकणार मागे; PM मोदींचं ‘हे’ स्वप्न येत्या 4 वर्षांत पूर्ण होणार, IMFकडून संकेत
भ्रष्टाचाराचाही केला उल्लेख
खर्गे यांनी महागाई, बेरोजगारी या विषयाबरोबरच मोदी सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचाही उल्लेख त्यांच्या ट्वीटमध्ये केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मोदी सरकारच्या चुकीच्या कारभारात भ्रष्टाचाराचा महापूर आला आहे, CAG ने अनेक अहवालात भाजपचा पर्दाफाश केला आहे, जम्मू-काश्मीरमध्ये 13000 कोटींचा जल जीवन घोटाळा उघडकीस आला आहे, त्यात एका दलित IAS अधिकाऱ्याचा छळ झाला होता, कारण त्यांनी भ्रष्टाचार उघड केला. सोबतच पंतप्रधानांच्या जीवलग मित्राची लूट नुकतीच पुन्हा समोर आली आहे. आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर, विरल आचार्य यांनी 2019 च्या निवडणुकीपूर्वी आरबीआयच्या तिजोरीतून 3 लाख कोटी रुपये मोदी सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या सरकारी दबावाला विरोध केला होता, हे आता उघड झाल्याचेही त्यांच्या ट्वीटमध्ये नमुद आहे.
हेही वाचा : सुप्रीम कोर्टातील महिला वकिलाच्या हत्येप्रकरणी पतीला अटक; काय होती प्लॅनिंग?
राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यास टाळाटाळ
मल्लिकार्जुन खर्गें यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दुःख व्यक्त केले आहे की, मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत पुन्हा हिंसाचार झाला, हिमाचल प्रदेशात आपत्ती आली, पण अहंकारी मोदी सरकार याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यास टाळाटाळ करत आहे. तर या सगळ्यात मोदी सत्य लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण जनतेला मोदी सरकारचे लक्ष विचलित करणाऱ्या मुद्द्यांऐवजी सत्य ऐकायचे आहे आणि बघायचे आहे असे नमुद केले असून, सरकारला थेट आव्हान दिले आहे की, मोदी सरकारने लक्षपूर्वक ऐकावे जनतेने 2024 मध्ये तुमच्या जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे असाही उल्लेख त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये केला आहे.