Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश आता राहुल गांधी आम्हाला शिकवतील का चीनचे काय करायचे तर; केंद्रीय मंत्र्याचा...

आता राहुल गांधी आम्हाला शिकवतील का चीनचे काय करायचे तर; केंद्रीय मंत्र्याचा कॉंग्रेसला प्रत्युत्तर

Subscribe

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवरून निशाणा साधला होता.

नवी दिल्ली : कॉंग्रेसच नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी चीन आपल्या देशात घुसखोरी करून जमिनी बळकावत असल्याचे वक्तव्य लडाखमध्ये जाऊन केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आता सत्ताधारी भाजपकडून चांगलाच समाचार घेतला जात असून, आज 21 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटवार करताना म्हटले की, राहुल गांधी चीनच्या घुसखोरीबाबत काहीही बोलत असून, ते असे केसच बोलू शकतात असे म्हणत कॉंग्रेसवर पलटवार केला आहे.(Now Rahul Gandhi will teach us what to do with China Union Ministers reply to Congress)

- Advertisement -

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, राहुल गांधी चीनबद्दल काहीही कसे बोलतात?, त्यांनी चीनसोबत सामंजस्य करार केला आहे आणि ते चिनी राजदूतांना भेटत राहतात. आता तेच आम्हाला चीनचे काय करायचे ते शिकवणार का?, चिनी सरकारला राग येईल म्हणून ते रस्ता बांधणार नाहीत. पंतप्रधान मोदींच्या सरकारने कोणतीही तडजोड केलेली नाही, कोणत्याही देशाला आमच्या प्रादेशिक अखंडतेची एक इंचही जमिन देण्यास परवानगी देणार नसल्याचेही म्हटले आहे.

हेही वाचा : चीनच्या घुसखोरीवरून राहुल गांधींचा पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा; म्हणाले- ही चिंतेची बाब…

मोदी सरकारच्या काळात झिरो टॉलरेन्स

- Advertisement -

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या इतिहासात फक्त मोदी सरकारच्या काळातच झिरो टॉलरेन्स अशी परिस्थिती देशात आहे. तर मोदी सरकारने सुरक्षेबाबत अशी भूमिका घेतली आहे की, झिरो टॉलरन्सबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

हेही वाचा : भ्रष्टाचाराची 6 हजार 841 प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित, सीव्हीसी अहवालातून खुलासा

काय म्हणाले होते राहुल गांधी?

कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी लेह लडाखच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त लडाखमधील पॅंगॉन्ग तलावाच्या काठावर श्रद्धांजली वाहिली होती. यावेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवरून निशाणा साधला होता. चीनने केलेल्या घुसखोरीच्या वक्तव्यावरुन देशात सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले होते.

- Advertisment -