घरदेश-विदेशCovid-19: आता मोबाइल फोनद्वारे करता येणार कोरोना संसर्गाची तपासणी; वाचा सविस्तर

Covid-19: आता मोबाइल फोनद्वारे करता येणार कोरोना संसर्गाची तपासणी; वाचा सविस्तर

Subscribe

देशभरात कोरोना प्रादुर्भाव सुरू असून कोरोनाची चाचणी करण्याचे प्रमाणही तितक्याच वेगाना सुरू आहे. कोरोनाची तपासणी प्रक्रिया वेगवान करण्याबरोबरच नवीन पर्यायांवरही सातत्याने संशोधन केले जात आहे. या प्रयत्नांमध्ये युके युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांना कोविड -१९ चाचणी करण्याचा अचूक, स्वस्त मार्ग सापडला आहे. यामध्ये, कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या लोकांचे स्वॅब नमुने मोबाइल फोनद्वारे तपासले जाऊ शकतात, असे तंत्रज्ञान विकसित झाल्याचे समोर आले आहे.

संशोधकांच्या मते, स्वॅबचे नमुने स्मार्टफोनच्या स्क्रीनवरून संकलित करण्यात आले आणि त्यांचे विश्लेषण केले गेले. अशा प्रकारे ते सर्व लोक संक्रमित असल्याचे आढळले, जे सामान्य पीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळले. या प्रक्रियेमध्ये स्वॅबचे नमुने थेट लोकांकडून गोळा करण्याऐवजी स्मार्टफोनची मदत वापरण्यात आली. या नवीन पद्धतीस फोन स्क्रीन टेस्टिंग (पीओएसटी) असे देखील म्हणतात. मिळालेल्या माहितीनुसार, साधारण ८१ ते १०० लोकांच्या मोबाइल फोनवरून कोरोनाने संक्रमित लोक असल्याचे समोर आले असून कोरोनाची लक्षणे त्यांच्यात स्पष्टपणे आढळली. संशोधकांनी सांगितले की, पीओएसटी चाचणी पारंपारिक पीसीआर चाचणीपेक्षा कमी खर्चिक आणि सुरक्षित आहे. ही चाचणी गरीब देशांसाठी एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यासाठी मोठ्या प्रमाणात संसाधनांची आवश्यकता नसली तरी कोणतीही अडचण येत नाही.

- Advertisement -

फोन स्क्रीन चाचणी (पीओएसटी) नमुने गोळा करण्यास एका मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो. तर विशेष म्हणजे कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांची आवश्यकता नसते. चिलीच्या स्टार्टअप डायग्नोसिस बायोटेकच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, संसर्ग रोखण्यासाठी नियमित चाचणी करणे आवश्यक आहे, परंतु गरीब देशांमध्ये ते अशक्य ठरत आहे. अशा परिस्थितीत ही पद्धत त्यांच्यासाठी प्रभावी ठरण्यास मदत होईल.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -