घरदेश-विदेशआता एकाच उमेदवाराला दोन नव्हे, तर एकाच जागेवर लढवता येणार निवडणूक?, केंद्र...

आता एकाच उमेदवाराला दोन नव्हे, तर एकाच जागेवर लढवता येणार निवडणूक?, केंद्र सरकारकडे प्रस्ताव

Subscribe

एकावेळी दोन-दोन जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोग मोठा धक्का देण्याच्या तयारी असून येत्या काळात एक उमेदवार एकच जागा लढवू शकतो. त्या उमेदवाराला दुसऱ्या जागी निवडणूक लढवू देण्यास मुभा देऊ नये. एक्सिझ पोल्ससह जनमत चाचण्यांवर बंदी आणवी, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्या संबंधी मागमी करणारा प्रस्ताव मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. निवडणूक आयोगाने पाठलेला हा प्रस्ताव जर मान्य झाला, तर 1951च्या कलम 37(1) मध्ये मोठा बदल होणार आहे.

अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवत असल्याचे अनेकदा पाहण्यात आले आहे. याला मुख्य निवडणूक आयोगाने विरोध केल्याचे प्रस्तावातून दिसत आहे. तसेच एक्झिट पोल्सची चर्चा निवडणूक निकालाची आधी तुफान असायची. या एक्झिट पोल्सवरही बंद येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

निवडणूक आयोगाने केल्या या मागण्या –

  • नव्या मतदारांची नोंदणी करण्यासाठी चार कटऑफ तारखंचा नियम जारी करावा
  • एका उमेदराला एकापेक्षा जास्त जागेवरुन निवडणूक लढवू देऊ नये, त्यासाठी लोकप्रतिनिधी कायदा 1951च्या कलम 33(7) मध्ये दुरुस्तीस मंजुरी द्यावी
  • राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला द्यावेत
  • एक्झिट पोल्स आणि जनमत चाचण्यांवर बंदी असावी
  • निवडणूक अधिसूचनेच्या दिवसापासून जोपर्यंत निवडणूक पूर्ण होत नाही, तोपर्यंत जनमत चाचण्याचं निकाल जाहीर करण्यावर बंदी घालावी
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -