Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccine: एका डोसमध्ये काम तमाम! Sputnik Lightला भारतात ट्रायलासाठी मिळाली मंजूरी

Corona Vaccine: एका डोसमध्ये काम तमाम! Sputnik Lightला भारतात ट्रायलासाठी मिळाली मंजूरी

Related Story

- Advertisement -

सध्या देशभरात वेगाने लसीकरण सुरू आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ६१ लाख १५ हजार ६९० जणांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात ७५ कोटी ८९ लाख १२ हजार २७७ जणांचे लसीकरण झाले आहे. आता लवकरच देशात कोरोना प्रतिबंधात्मक अजून एक लस येणार आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने स्पुटनिक लाईटला भारतामध्ये ट्रायल करण्याची मंजूरी दिली आहे. ही लस सिंगल डोसवाली आहे. म्हणजेच या लसीचा फक्त एक डोस घेऊन कोरोना विरोधात लढू शकालं.

स्पुटनिक लाईटला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतील लोकांवर फेज-३ ट्रायल करण्यासाठी मंजूरी दिली आहे. कोरोनावरील बनवलेली सब्जेक्ट एक्सपर्ट कमेटीने (SEC) स्पुटनिक लाईटला ट्रायलला मंजूरी देण्याची शिफारस केली होती.

- Advertisement -

यापूर्वी जुलैमध्ये SECने रशियाच्या सिंगल डोस लसीला भारतात आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्याची शिफारस केली होती. परंतु भारतामध्ये ट्रायल न झाल्यामुळे सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशनने लसीला (CDSCO) नाकारले होते. कमेटीने म्हटले होते की, स्पुटनिक लाईटमध्येही स्पुटनिक-व्ही सारखे घटक आहेत. यामुळे भारतीयांवरील संरक्षण आणि अँटीबॉडीजचा डेटा पहिल्यापासून तयार आहे.

स्पुटनिक लस उत्पादन घेणाऱ्या रशियाच्या कंपनीने असा दावा केला की, स्पुटनिक व्हीचा लाईट व्हर्जनचा एक डोस ८० टक्क्यांपर्यंत प्रभावी असून दोन डोस घेणाऱ्या लसींपेक्षा जास्त असरदार आहे. रशियाच्या सरकारकडून स्पुटनिक लाईटच्या वापरासाठी मान्यता मिळाली आहे. दरम्यान स्पुटनिक व्हीच्या ट्वीटरवर सांगितले की, स्पुटनिक लाईटचा वापर करून लसीकरण वेगाने केले जाऊ शकते आणि यामुळे कोरोना पीक नियंत्रित आणण्यास मदत होईल.


- Advertisement -

हेही वाचा – जग कोरोना संकटातून लवकर मुक्त होणार नाही, WHO ने दिला इशारा


 

- Advertisement -