आता ‘आधार’ वापरणे तुमच्या हातात, वाचा आधार संदर्भातील नवा नियम

आता तुमची ओळख सादर करण्यासाठी आधार सादर करण्याची काहीच गरज नाही. कारण आधार वापरणे हे तुमच्या हातात असणार आहे. वाचा काय झाले पंतप्रधानांच्या बैठकीत

Name, address, number not updated on Aadhar card? Follow the simple steps
Aadhar card वर नाव,पत्ता,नंबर अपडेट होत नाहीय? फॉलो करा सोप्या स्टेप्स

आता ओळखीसाठी आधार सादर करणे  तुमच्या हातात असणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलानुसार नव्या मोबाईल कनेक्शनसाठी आणि बँक खात्यासाठी आता आधार अनिवार्य नसेल. जर ग्राहकाची इच्छा असेल तरच ते आधारचा उपयोग ओळखपत्र म्हणून करु शकतात.त्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती नसणार आहे. या नव्या निर्णयासंदर्भातील बील लोकसभेमध्ये सादर देखील केले जाणार आहे. त्यामुळे आता आधारच्या कटकटीपासून सामान्यांची सुटका होणार आहे.

लोकसभेत लवकरच मांडणार विधेयक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत टेलिग्राफ कायद्यातील दुरुस्ती करण्यात आली. या बैठकित प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिग कायद्यातही सुधारणा करण्यात आली. आता लवकरच या संदर्भातील विधेयक तयार केले जाणार आहे आणि लवकरच लोकसभेत सादर केले जाणार आहे.

वाचा- TRAI च्या चेअरमनांचे गीरे तो भी टांग उपर!!

सुप्रीम कोर्टाने आधारची सक्ती काढून टाकली

आधारच्या सुरक्षेवरुन या आधीही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या सुरक्षेच्या कारणामुळेच आधारवरील सक्ती काढून टाकण्यात आली होती. सब्सिडी आणि विद्यार्थ्यांना मिळाणारी शिष्यवृत्ती वगळता आधार सक्ती ही कुठेही करण्यात आलेली नाही.

हे माहीत आहे का?-परदेशात बसून ‘आधार’ केले हॅक

आधारच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह

ट्रायचे अध्यक्ष यांनी आधार सुरक्षित आहे असे म्हणच हिंमत असेल तर आधार हॅक करुन दाखवा, असे उघड आव्हान त्यांनी ट्विटरवर दिले होते. त्यांचे हे आव्हान स्विकारत लगेचच एका जर्मन हॅकरने त्यांचे आधारकार्ड हॅक करुन त्यांची माहिती त्यांना दिली होती. त्यामुळे आधार किती सुरक्षित या संदर्भात प्रश्न उभे राहिले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने धा संदर्भातील सक्ती काढून टाकली.

वाचा-  तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे का? असा लावा शोध