घरCORONA UPDATEआता 'आरोग्य सेतु' अ‍ॅपवरून मिळवता येणार कोरोनाबाधितासाठी प्लाझ्मा

आता ‘आरोग्य सेतु’ अ‍ॅपवरून मिळवता येणार कोरोनाबाधितासाठी प्लाझ्मा

Subscribe

देशात कोरोना विषाणुच्या दुसऱ्या लाटेचा हैदोस कायम असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यात दिलासाजनक बाब म्हणजे देशात कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. परंतु कोरोनाबाधितांचा वाढत्या मृत्यूचे प्रमाणही चिंतेची बाब ठरत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोनाविरोधी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी ही एक प्रभावी उपचार पद्धती असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले जात आहे.

यात आता केंद्र सरकारने रुग्णांना त्वरीत प्लाझ्मा मिळवून देण्यासाठी आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये बदल केले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अ‍ॅप म्हणून आरोग्य सेतू अ‍ॅप लॉन्च केले होते. याचा वापर आता लसीकरणासाठी देखील केला जात आहे. मात्र आता लवकरचं आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये प्लाझ्मा डोनरची लिस्ट दिली जाणार आहे. त्यामुळे त्वरित प्लाझ्मा मिळवू इच्छिणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळणार आहे. ज्या लोकांना प्लाझ्मा हवा आहे, त्यांना या ठिकाणी डोनरची यादी पाहायला मिळू शकणर असू प्लाझ्मा मिळवू शकता असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

एका रिपोर्टनुसार, आरोग्य सेतु अ‍ॅपवर लवकर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा डेटा बेस तयार केला जाणार आहे. हा डेटा प्लाझ्मा डोनरसाठी उपयुक्त असणार आहे. परंतु प्लाझ्मा डोनेशनसाठी कोणत्याही कोरोनामुक्त रुग्णावर दबाव टाकला जाणार नाही. जर या यादीतील कोणतीही व्यक्ती स्वच्छेने प्लाझ्मा डोनेट करणार असतील तर याची माहिती आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे सरकारला दिली जाऊ शकते. परंतु यावर केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही.

आरोग्य सेतु अ‍ॅपमध्ये सतत अनेक फीचर्स जोडले जात आहेत. यात आता लसीकरणासाठीही रजिस्ट्रेशनची सर्व माहिती मिळू शकते. कोरोना संसर्ग कायम असताना अशा प्रकारचा येणारी माहिती दिलासादायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. मात्र, प्लाझ्मा थेअरीबाबतही तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

- Advertisement -

देशात कोरोनाचा कहर अजून सुरुच राहणार, पुन्हा उद्भवू शकते महामारी, केंद्राचा इशारा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -