घरदेश-विदेशधक्कादायक! आमदार अबो यांच्यासह कुटुंबातील १० जणांची निर्घृण हत्या

धक्कादायक! आमदार अबो यांच्यासह कुटुंबातील १० जणांची निर्घृण हत्या

Subscribe

अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे आमदार तिरोंग अबो यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्यासोबत इतर १० जणांचीही हत्या झाली आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचे आमदार तिरोंग अबो यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्यासोबत इतर १० जणांचीही हत्या झाली आहे. अबो यांच्या सुरक्षारक्षकांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही खून करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, संशयित एनएससीएन (नॅशनल सोशालिस्ट काउंसिल ऑफ नागालँड)च्या दहशतवाद्यांचा या हल्ल्याच्या मागे हात असल्याची शक्यता आहे. ही घटना अरुणाचल प्रदेशच्या तिरप जिल्ह्यातील बोगापानी गावात झाली आहे.


ठाकरेंसाठी एनडीएच्या बैठकीत पुरणपोळीचा खास बेत?


- Advertisement -

अबो हे अरुणाचल प्रदेशच्या खोंसा-पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी आमदार तिरोंग अबो आणि त्यांच्या घरच्यांवर हल्ला केला. सर्वात आधी हल्लेखोरांनी अबो यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीय आणि सुरक्षा रक्षकांची हत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

- Advertisement -

‘टीम इंडिया’ फॉर्मात; ‘वर्ल्ड कप’साठी आज रवाना होणार


अरुणाचल प्रदेशचे माजी गृहमत्री कुमार वाई यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -