घरताज्या घडामोडीNSE Scam : चित्रा रामकृष्णा यांना CBI कोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज...

NSE Scam : चित्रा रामकृष्णा यांना CBI कोर्टाचा झटका, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Subscribe

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) चे माजी मुख्य अधिकारी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेष सीबीआय कोर्टाने चित्रा रामकृष्ण यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. हिमालयातील एका कथित योगींच्या इशाऱ्यावर काम करण्याचा आणि निर्णय घेण्याचा आरोप आहे. तसेच गोपनीय माहिती लीक केला असल्याचा आरोप चित्रा यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात त्यांची सीबीआय चौकशी सुरु असून अटकेची टांगती तलवार आहे. यामुळे चित्रा रामकृष्ण यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. परंतु अर्ज फेटाळल्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

सीबीआयने एनएसईचे माजी अधिकारी आनंद सुब्रमण्यम यांना चेन्नईमधून अटक केली होती. असे सांगण्यात येत आहे की, हिमालयातील योगी दुसरे कोणी नसून ते सुब्रमण्यमच आहेत. सुब्रमण्यम यांच्यावर एनएसईच्या कामकाजात दखल दिला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेच एनएसईचे माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना सल्ला देत होते आणि त्या त्यांच्या इशाऱ्यावर काम करत होते. सुब्रमण्यम ६ मार्चपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत.

- Advertisement -

सीबीआयने वाढवली चौकशीची व्याप्ती

सुब्रमण्यम एनएसईमध्ये चित्रा यांना सल्ला देत होते. सीबीआयने मागील आठवड्यात एनएसईने ठिकाणा बाबात तपास सुरु केला आहे. या प्रकरणात २०१८ मध्ये सीबीआयने तक्रार दाखल केली होती. मे २०१८ च्या एफआयआरमध्ये चित्रा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु यामध्ये एनएसई आणि सेबीच्या काही अज्ञात अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले होते. एफआयआरमध्ये पुरावे नष्ट करण्याचा आणि षडयंत्र रचला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच घुसखोरी आणि पदाचा गैरवापर केला असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

सेबीकडून आरोप करण्यात आला आहे की, चित्रा रामकृष्ण गोपनीय माहिती अज्ञात व्यक्तिला सांगत होत्या. यामध्ये एनएसईचे पाच वर्षाचा आर्थिक अहवाल, डिविडेंट पेआउट रेश्यो, एक्सचेंजचा बिझनेस प्लॅन आणि एनएसई बोर्ड मीटिंगमधील एजेंड्याचा समावेश आहे. चित्रा रामकृष्ण यांनी चौकशीमध्ये म्हटलं होते की, अज्ञात व्यक्ती एक योगी असून ते हिमालयात राहतात. सेबीने या संदर्भातील १९० पानांचा अहवाल शुक्रवारी जारी केला होता.


हेही वाचा : Pune Metro : पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्याआधीच पवारांची टोलेबाजी, म्हणाले याकडे अधिक लक्ष…

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -