घरताज्या घडामोडीNSE SCAM- घोटाळे रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या NSE मध्येच घोटाळा,वेदांचा ईमेल आयडी

NSE SCAM- घोटाळे रोखण्यासाठी बनवण्यात आलेल्या NSE मध्येच घोटाळा,वेदांचा ईमेल आयडी

Subscribe

बाबाच्या सल्ल्यावरून NSE चा कारभार चालावयाच्या हे त्यांनी स्वत:च सांगितल्याने स्टॉक एक्सेंजची झोप उडाली आहे. सेबीने sebi हे प्रकरण उजेडात आणलं आहे.

देशातील सर्वात मोठा स्टॉक एक्सेंज असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजची NSE सद्या जोरदार चर्चा सुरू आहे. एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामकृष्ण या कोणा तज्ज्ञांच्या नाही तर चक्क एका अज्ञात हिमालयीन बाबाच्या सल्ल्यावरून NSE चा कारभार चालावयाच्या हे त्यांनी स्वत:च सांगितल्याने स्टॉक एक्सेंजची झोप उडाली आहे. सेबीने sebi हे प्रकरण उजेडात आणलं आहे. हर्षद मेहता प्रकरणानंतर तसेच घोटाळे होऊ नयेत म्हणून एनएसई बनवण्यात आले होते. पण त्याचा कारभार जर एखाद्या बाबाच्या सल्ल्यावरून सुरू असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोण विश्वास ठेवेल असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

याप्रकरणी बाजारपेठ नियंत्रक ( market regulator)असलेल्या सेबीने 190 पानांचा अहवाल सादर केला आहे. यात गेल्या सहा सात वर्षांपासून NSE मध्ये सुरू असलेल्या घोटाळ्याचा लेखजोगाच मांडला आहे. यामुळे NSEसुध्दा घोटाळ्यात अडकल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

एनएसई सुरू करण्याचा मूळ उद्देश हा भांडवली बाजारात पारदर्शक व्यवहारता आणणे हा होता. पण चित्रा रामकृष्ण यांच्या आभासी बाबा आणि त्यांचा जवळचा अधिकारी असलेल्या आनंद सुब्रमण्यम या जोडगोळीने देशातील महत्वाच्या असलेल्या नॅशनल एक्सचेंजचा कारभार रामभरोसेच चालवल्याचे समोर आले.

Harshad Mehta Scam
1991 साली देशातील अर्थव्यवस्थेत उदारीकरणाला सुरूवात झाली होती. त्यानंतर वर्षभरातच 1992 एप्रिलमध्ये देशातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला. या घोटाळ्याचे सर्व धागेदोरे हर्षद मेहता याच्याशी जुळलेले होते. स्टॉक मार्केट आणि बँकीग सिस्टमधल्या उणीवांचा गैरव्यापर करत हर्षद मेहताने देशाला हादरवून टाकले. त्यानिमित्ताने आपली अर्थव्यवस्था किती कुचकामी आहे हे जगासमोर उघड झाले.

- Advertisement -

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने हर्षद मेहता घोटाळ्यासारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी संपू्र्णत आधुनिक तंत्रज्ञानावर एका नव्या स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिग्गज बँक एस एस नाडकर्णी S.S. Nadkarni कडे नव्या एक्सचेंजच्या आराखडा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर नाडकर्णीने पाच जणांची एक कोर कमिटी तयार केली. या कोर कमिटीमध्ये इंडस्ट्रियल डेवपलमेंट बैंक ऑफ इंडिया (IDBI)मध्ये बॉंड डेस्कवर काम करणाऱ्या एका तरुण महिला चार्टड अकाऊंटट चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna)यांचाही समावेश करण्यात आला.

या कोर कमिटीमध्ये प्रत्येक क्षेत्रातील एका तज्त्र व्यक्तीचा समावेश होता. या कमिटीला नवीन स्टॉक एक्सचेंजच्या कामकाजाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर ट्रेंडीग प्लेटफॉर्मवर त्यास अंतिम स्वरूप देण्याच्या नऊ महिन्याआधीच एनएसईवरून जून 1994 ला एक होलसेल डेट मार्केट ऑपरेशन करण्यात आले. हे ऑपरेशन यशस्वी झाले आणि अल्पावधीतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर एनसीईने लॉंचच्या एक वर्षाच्या आतच 100 वर्ष जुन्या BSE मागे टाकले.

सगळे ठिकठिक सुरू असतानाच पाच ऑक्टोबर 2012 साली एनएसईशी संबंधित ट्रेडींग प्लेटफॉर्ममध्ये गडबड झाल्याचे समोर आले. त्यानंतर काही सेकंदातच गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले. 15 मिनिट हा प्लेटफॉ्र्म गंडला आणि तत्कालिन सीईओ रवि नारायण यांना त्याची किंमत मोजावी लागली. या घटनेच्या काही महिन्यानंतरच चित्रा रामकृष्ण एनएसईच्या सीईओ झाल्या. त्यानंतर 2016 साली आनंद सुब्रमण्यमच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. याचपार्श्वभूमीवर रामकृष्ण यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. यादरम्यान एनसीईच्या कामकाजावर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उभारण्यात आले ज्याचा तपास आजही अनेक संस्था करत आहेत.

करामती बाबाने वेदांचा वापर करून बनवला ईमेल आयडी

दरम्यान, याप्रकरणी सेबीने सादर केलेल्या अहवालातून रोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हिमालयीन बाबा असला तरी अजून त्याची ओळख पटलेली नाही. याच्याशी संबंधित एक माहिती समोर आली आहे. त्यानुसार रामकृष्ण आणि बाबा ईमेलमधून संवाद साधत होते. विशेष म्हणजे बाबाच्या ईमेल आयडीचा हिंदूच्या वेद (Vedas) शास्त्राशी थेट संबध आहे. जवळजवळ सहा वर्षाच्या तपासानंतर सेबीने याघोटाळ्याचा १९० पानी अहवाल तयार केला आहे. यात चित्रा रामकृष्ण यांचे बाबाशी ईमेलमधून झालेल्या संवादापासून विविध व्यक्तींबरोबरच्या संवादाचाही समावेश आहे. यावेळी बाबांची आपल्याशी ओळख २० वर्षांपूर्वी गंगा नदीच्या किनाऱ्यावर झाल्याचे रामकृष्ण यांनी सांगितले. तसेच बाबा ही एक दैवी शक्ती असून त्यांचा हिमालयात वास आहे. त्यांना शरीराची गरज नाही. तर ते कधीही कुठेही प्रकट होऊ शकतात असा दावाही रामकृष्ण यांनी केल्याचे या अहवालात म्हटले आहे.

बाबांशी आपण [email protected] या ईमेलच्या माध्यमातून संवाद साधत होतो. असे रामकृष्ण यांनी सांगितले. हा ईमेल आयडी ऋग,यजुर आणि सम Rig, Yajur आणि Sama हे शब्द एकत्रित करून बनवण्यात आला आहे. सनातन धर्मातील चार वेद ऋगवेद (Rigved),यजुर्वेद (Yajurved), सामवेद (Samved) आणि अथर्ववेद (Atharvaved)यांपैकी तीन वेदांचा यात समावेश आहे.

एवढेच नाही तर बाबाच्या सांगण्यावरून रामकृष्ण यांनी आनंद सुब्रमण्यम याला एनएसईचे दुसरे महत्वाचे पद दिले होते. तसेच आपल्या पगारातील काही टक्के रक्कमही रामकृष्ण दरमहा बाबाला दक्षिणा म्हणून देत होत्या. त्यासाठी एनसीईने आनंद याला गलेलठ्ठ पगारवाढीसह नोकरी दिली होती. आधी आनंद याला 15 लाख पगार होता. पण एनसीईमध्ये आल्यावर त्याला 1.38 लाख कोटींचे पॅकेज देण्यात आले होते. पण हे प्रकरण उघड होईपर्यंत आनंदचा पगार 4 कोटीहून अधिक झाला होता.

तर दुसरीकडे रामकृष्ण यांच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घेत आनंदनेच बाबाच्या नावाने फेक अकाऊंट तयार केले आणि त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे बोलले जात आहे. तर सेबीने यास नकार दिला असून एनसीईला फसवणाऱ्या बाबाचा 2 आठवड्यात पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -