घरCORONA UPDATEचिंता वाढली! देशातील Delta Plus बाधितांची संख्या ४० वर

चिंता वाढली! देशातील Delta Plus बाधितांची संख्या ४० वर

Subscribe

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे बाधितांची सर्वाधित संख्या असलेल्या राज्यात आता तमिळनाडू राज्याचा देखील समावेश

कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) देशाची चिंता आणखी वाढली असून त्या चिंतेत आणखी भर पडली आहे. देशातील डेल्टा प्लस बाधितांची संख्या आता ४० वर पोहचली आहे. (number of Delta Plus Variant Positive patients in India is over 40 ) डेल्टा प्सलच्या रुग्णांची संख्या ही महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, केरळ आणि तमिळनाडू जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. (most cases from maharashtra, kerala,madhya pradesh and tamilnadu) काल पर्यंत देशातील डेल्टा प्लस बाधितांची संख्या ही २२ इतकी होती. देशातील डेल्टा प्लसच्या बाधित रुग्णांची संख्या जरी कमी असले तरी त्याची क्षमता आणि त्याचा वेगाने होणार प्रसार लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालायाने महाराष्ट्र,केरळ आणि मध्यप्रदेश या तीन राज्यांना तातडीने महत्त्वाची पावले उचलण्याचा इशारा दिला होता. मात्र आता दुसऱ्याच दिवशी देशातील डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे बाधितांची सर्वाधित संख्या असलेल्या राज्यात आता तमिळनाडू राज्याचा देखील समावेश झाला आहे. डेल्टा प्लसच्या बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता देशात येणारी कोरोनाची तिसरी लाट आधीच्या लाटेपेक्षा तीव्र असल्याचे दिसून येत आहे.


नीति आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस हवेत फिरत आहे. अशावेळी व्हायरसने त्याचे रुप बदलले की मोठी अडचण निर्माण होते. याविषयी कोणतेही भविष्यवाणी करणे कठीण आहे. कोरोना विरोधी लस घेऊन आपण त्यांची संवदेनशीलता कमी करु शकतो. अनेक देशात कोरोनाची चौथी लाट देखील येऊन गेली आहे. कोरोनाच्या लाटेसाठी कोणतेही नियम नाहीत त्याविषयी आपण कोणतीही निश्चितता देऊ शकत नाही.

- Advertisement -

कोरोना व्हायरस वारंवार आपले रुप बदलत आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट हा देशात मिळालेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे बदललेले स्वरुप आहे. हा व्हायरस B.1.617.2.1 किंवा AY.1 या नावाने देखील ओळखला जातो. डेल्टा प्लस व्हेरिएंट मार्च २०२१मध्ये यूरोपमध्ये आढळून आला होता त्यानंतर तो इतर देशांमध्ये देखील आढळून आला.


हेही वाचा – महाराष्ट्रासह ‘या’ ३ राज्यांना Delta Plus Variant चा सर्वाधिक धोका, तातडीने पावलं उचलण्याचा केंद्राचा इशारा

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -