अटकपूर्व जामिनासाठी नुपूर शर्मा सर्वोच्च न्यायालयात

विविध पोलीस ठाण्यात सुरू असलेले गुन्हे एकाच ठिकाणी वर्ग करण्याची मागणीही तिने या याचिकेतून केली आहे.

Supreme Court decision Corona vaccine cannot be enforced to people

पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नुपूर शर्माविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तिच्याविरोधात देशभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, तिने अटकेपूर्व जामीन मिळावा अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसेच, विविध पोलीस ठाण्यात सुरू असलेले गुन्हे एकाच ठिकाणी वर्ग करण्याची मागणीही तिने या याचिकेतून केली आहे. (Nupur Sharma in Supreme Court for pre-arrest bail)

नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्याही येत असल्याचं तिने सांगितलं. दरम्यान, या महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा हिला फटकारले होते. तिच्यामुळे जगभरात देशाची बदनामी झाल्याने तिने सर्वांसमोर माफी मागावी असं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं होतं. दरम्यान, तिच्यावर दाखल असलेले विविध पोलीस ठाण्यातील गुन्हे एकाच ठिाकणी आणण्याच्या मागणीवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.

उदयपूर टेलर हत्या प्रकरणी चौघांना अटक

नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानमधील उदयपूर येथे 28 जून रोजी टेलर कन्हैयालाल याची निर्घृण हत्या झाली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. कन्हैयालाल हत्या प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारी कटात दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन मुख्य आरोपींसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद अशी हत्या करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपीने एक ऑनलाइन व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात कन्हैयालालचा शिरच्छेद करून त्याची हत्या केल्याचा दावा केला होता. दोन्ही आरोपींना राजसमंदच्या भीम परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. कन्हैयालालच्या हत्येचा कट रचण्यात दोघेही सामील होते. मोहसीन आणि आसिफ अशी त्यांची नावे आहेत.