घर देश-विदेश प्रियकर बनलेल्या रुग्णावर, नर्सने केला बलात्काराचा आरोप

प्रियकर बनलेल्या रुग्णावर, नर्सने केला बलात्काराचा आरोप

Subscribe

लग्नाचं वचन देऊनही ते न पाळणाऱ्या प्रियकरावर एका नर्सने थेट बलात्काराचा आरोप केला आहे.

आधी प्रियकर बनलेल्या रुग्णावर नंतर नर्सने बलात्काराचा आरोप करत त्याच्याविरुद्ध पोलीसात तक्रार नोंदवल्याचा, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणातील आरोपीचं नाव महादेवा प्रसाद (२५) असं असून, सध्या तो फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रार करणाऱ्या नर्सने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी महादेवा म्हैसूरच्या एका रुग्णालयात दाखल झाला होता. त्यादरम्यान त्याचे नर्ससोबत प्रेमसंबंध जुळले. त्यावेळी पीडित तरुणी नर्सिंगचं शिक्षण घेत होती. महादेवा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन गेल्यानंतरही ते दोघं एकमेकांच्या संपर्कात होते. त्यावेळी ते दोघंही कर्नाटकातील गुंडलूपेठमध्ये वास्तव्याला होते. दोघांची जात सारखीच असल्यामुळे महादेवाने पीडित नर्सला लग्नाचं वचनही दिलं होतं. एक वर्षानंतर महादेवाने तिला बंगळुरुतील एका मोठ्या हॉस्पटलमध्येही नोकरीही मिळवून दिली. त्या दोघांमध्ये सर्वकाही अगदी सुरळीत सुरु होतं.


वाचा: बेस्ट कर्मचाऱ्यांचा ‘दिवाळी बोनस’ कागदावरच!

मात्र, काही काळानंतर अचानक त्याची माझ्याशी वागणूक बदलल्याचं पीडित नर्स सांगते. महादेवाने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो लग्नाच विषय टाळायला लागल्याचं तीने पोलिसांना सांगितलं. मी लग्नाची वारंवार विचारणा करुनही तो उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं पीडितेने सांगितलं. आम्ही एकाच जिल्ह्यातील आणि एकाच जातीतील असूनही तो मुद्दाम लग्नाला नकार देत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पीडित नर्सने महादेवाविरोधात कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत तक्रार दाखल केली.


वाचा: बिग बी झळकणार ‘या’ मराठी चित्रपटात!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -