घरदेश-विदेशcovid pandemic: एका फुफ्फुसाच्या जोरावर मध्यप्रदेशातील नर्सने केली कोरोनावर मात

covid pandemic: एका फुफ्फुसाच्या जोरावर मध्यप्रदेशातील नर्सने केली कोरोनावर मात

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून एका फुफ्फुसाच्या जोरावर मध्यप्रदेशातील नर्सने केली कोरोनावर मात केल्याचा दिलासादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातील टीकमगड सिव्हील हॉस्पिटलमधील ३९ वर्षीय नर्स, प्रफु्ल्लित पीटर यांच्या शरीराचे कार्य फक्त एका फुफ्फुसावर चालते. लहानपणी झालेल्या अपघातानंतर प्रफु्ल्लित पीटर यांच्या शरीरातील एका बाजूचे फुफ्फुस त्याच्या शरीरातून काढून टाकण्यात आले होते. याची माहिती त्यांना २०१४ मध्ये मिळाली. ज्यावेळी ते आजारी होते, तेव्हा त्याचा एक्स-रे काढण्यात आला. त्या एक्स-रेच्या अहवालात डावे फुफ्फुस नसल्याचे दिसून आले.

प्रफुल्लित पीटर या नर्स असून सध्या त्याची ड्युटी कोरोना वॉर्डमध्ये सुरू आहे. मात्र या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान त्या देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्याचा परिणाम मनुष्याच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे प्रफुल्लित पीटर या कोरोनातून कशा बऱ्या होणार याची सर्वांनाच चिंता होती. मात्र त्यांनी प्रचंड इच्छा शक्ती आणि एका फुफ्फुसाच्या आधारेच कोरोनावर मात केली. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी घरातच होम क्वारंटाईन राहून अवघ्या १४ दिवसातच कोरोनाविरूद्धची लढाई जिंकली.

- Advertisement -

कोरोनातून बरे झाल्यानंतर, पीटर यांनी सांगितले की, कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांनी घरातच क्वारंटाईन होऊन कोरोनाचे उपचार केले. यावेळी क्वारंटाईन असताना धैर्य गमावले नाही आणि दररोज योगासने केले, प्राणायाम केले. त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते त्यामुळे खात्री होती की, कोरोनाचा संसर्ग झाला असला तरी परिस्थिती गंभीर होणार नाही. आणि अखेर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -