घरCORONA UPDATEआईला कोरोनाची लागण; आता नर्स घेत आहेत ३ महिन्यांच्या मुलीची काळजी

आईला कोरोनाची लागण; आता नर्स घेत आहेत ३ महिन्यांच्या मुलीची काळजी

Subscribe

कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समजलं, तेव्हा एम्सच्या दोन परिचारिकांनी मुलीची काळजी घेण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाच्या संकटात काही अशा भावनिक बातम्या समोर येत आहेत, ज्याने सर्वांचा उर भरुन येतोय. छत्तीसगडची राजधानी रायपूरमधून असंच भावनिक चित्र समोर आलं आहे. एम्स रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेला दाखल करण्यात आलं आहे. या महिलेला ३ महिन्यांची मुलगी आहे. या ३ महिन्यांच्या मुलीची काळजी रुग्णालयातील दोन परिचारिका घेत आहेत.

छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात राहणारी एक कोरोना पॉझिटिव्ह महिला रायपुरमधील एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाली आहे. महिला आपल्याबरोबर तीन महिन्यांची मुलगीही घेऊन आली. मुलीमध्ये हा संसर्ग पसरवू नये म्हणून मुलीला तिच्यापासून वेगळं ठेवणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयाने प्रथम मुलीच्या आजीला बोलावले पण तिचा नमुनाही पॉझिटिव्ह आला. यानंतर मुलीच्या मामाला बोलवण्यात आलं. जेव्हा मुलीचा मामा रूग्णालयात पोहोचला आणि त्यांची तपासणी केली गेली तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समजलं, तेव्हा एम्सच्या दोन परिचारिकांनी मुलीची काळजी घेण्याचा ठरवलं.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अमेरिका, पाकिस्तान नंतर आता युएई मागतोय भारताकडे मदत


रायपूरस्थित एम्सचे संचालक नितीन एम. नागरकर यांनी सांगितलं की, बाळ खूप लहान आहे, म्हणून तिला नियमितपणे दुधाची आवश्यकता आहे, परंतु आईला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे तिचं दूध मुलीला दिलं जात नाही आहे. आता एम्सच्या दोन महिला परिचारिका बाळाला बाटलीतून दुध देत आहेत. मुलीला संसर्ग होऊ नये म्हणून दोन्ही महिला परिचारिका पीपीई किट घालून मुलीची काळजी घेत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -