घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटया लोकांना कोरोना लसीचा उपयोग होणार नाही? जीवनशैलीत करावा लागेल बदल

या लोकांना कोरोना लसीचा उपयोग होणार नाही? जीवनशैलीत करावा लागेल बदल

Subscribe

कोरोनाचे वाढते संक्रमन जगासाठी चिंतेचा विषय बनलेला आहे. संपुर्ण जग चातकाप्रमाणे कोरोनावरील लस कधी येतेय याची वाट पाहत आहे. रशिया आणि चीनने लसीचे पेटंट मिळवले असून भारत, ब्रिटन आणि अमेरिकासह अनेक देश लस बनविण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत. भारतासहीत अनेक देशांत या वर्षाच्या शेवटापर्यंत लस बनून तयार असेल तसेच त्याला मंजुरी मिळेल असे सांगितले जात आहे. तर २०२१ पासून लस देण्यास सुरुवात होऊ शकते. काही लोकांना लसीचा सिंगल डोस तर काहींना डबल डोस देण्याची आवश्यकता आहे. मात्र एका नव्या संशोधनानुसार लठ्ठ लोकांवर कोरोना लसीचा फारसा उपयोग होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

नार्थ कॅरोलिना विद्यापीठातील संशोधकांनी ओबेसिटी रिव्ह्यू जर्नलमध्ये एक अवहाल प्रकाशित करण्यात आला आहे. आपल्या संशोधनांत वैज्ञानिकांनी फ्लू आणि हेपेटायटिस-बी लसीचा हवाला दिला आहे. २०१७ साली अतिलठ्ठ आणि लठ्ठ असलेल्या व्यक्तींमध्ये या दोन्ही लसी फार प्रभावी ठरल्या नाहीत. या लशींमुळे अँटीबॉडी निर्माण होण्यात अडचणी येत होत्या.

- Advertisement -

संशोधनात असेही सांगितले गेले की, लठ्ठ व्यक्तींना फ्लू आणि हेपेटायटिस रोगाच्या संक्रमणाचा धोका अधिक असतो. तसेच संक्रमण झाल्यानंतर तब्येत खराब होणे आणि काही वेळा मृत्यूचा धोकाही वाढल्याचे दिसलेले आहे. त्यामुळे कोरोनावरील लस आली तरी मागचा अनुभव पुन्हा येण्याची शक्यता आहे, असा अंदाच वैज्ञानिकांनी वर्तविला आहे. तसेच डॉ. छाड पेटीट (Dr. Chad Petit) यांनी लठ्ठ व्यक्तिंवर लसीचा उपयोग न होण्याची दोन कारणे दिली आहेत.

पहिलं म्हणजे – टी कोशिका व्यवस्थित काम करत नाहीत. इम्यून सिस्टिममधून अँटिबॉडी निर्माण करण्याची सूचना टी कोशिकाच देत असतात.

- Advertisement -

दुसरं म्हणजे – रोगप्रतिकारक शक्ती सक्रीय झाल्यानंतर शरीरात सूज वाढते. त्यामुळे मॅक्रोफेज (Macrophage) नावाचे विशेष कोशिकांचे उत्पादन घटते. मॅक्रोफेज शरिरातील घातक तत्त्वांना नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात.

लसीच्या सुईचा आकार महत्त्वाचा

Vanderbilt University च्या आरोग्य विभागाचे संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. विल्यियम शॅफनर यांनी सांगितले की, लोकांचे लसीकरण करत असताना सुईचा आकार खूप महत्त्वाचा असतो. पारंपरिक रुपात एक इंच लांब सुई वापरली जाते, त्यामुळे लठ्ठ लोकांमध्ये इम्युनिटी निर्माण होण्याची शक्यता कमी होती. लठ्ठ लोकांसाठी थोडी मोठी सुई वापरणे गरजेचे आहे, ज्यामुळे लसीतले औषध मांसात खोलवर जाऊ शकेल.

जीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता

वैज्ञानिकांनी अंदाज वर्तविला असला तरी कोरोनाची लस आल्यानंतर त्यावर आणखी विस्तृत संशोधन होऊ शकते. मात्र आपण जीवनशैलीत बदल करुन लठ्ठपणा आटोक्यात आणू शकतो. फास्ट फूड, जंग फूड यांना तिलांजली देत सकस आहाराचे सेवन करणे, रोज चालणे किंवा धावणे, व्यायाम-योगासाठी वेळ काढणे आणि पुरेशी झोप घेणे इत्यादी नियमांचे पालन करुन आपण लठ्ठपणावर मात करु शकतो. जेणेकरुन आपली रोगप्रतिकारशक्ती नैर्सगिक पद्धतीनेच वाढू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -