घरदेश-विदेशपाटणा जंक्शनमधील स्क्रीनवर सुरू झाली अश्लिल फिल्म, रेल्वे अधिकाऱ्याकडून मोठी कारवाई

पाटणा जंक्शनमधील स्क्रीनवर सुरू झाली अश्लिल फिल्म, रेल्वे अधिकाऱ्याकडून मोठी कारवाई

Subscribe

पाटणा : रविवारी (19 मार्च) सकाळी पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या डझनभर टीव्ही स्क्रीनवर अचानक अश्लील फिल्म सुरू झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. प्लॅटफॉर्मवर महिला आणि पुरुष आपल्या मुलांसोबत ट्रेनची वाट पाहत उभे होते, मात्र अचानक ही घटना घडल्यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत आरपीएफकडे तक्रार केली आणि आरपीएफने तात्काळ फोन करून संबंधित एजन्सीला ती फिल्म बंद करण्यास सांगितले. याप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.

हेही वाचा – तीन राज्यांत गेल्या 24 तासांत 918 रुग्ण, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

- Advertisement -

तीन मिनिटे सुरू होता अश्लील फिल्म
समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे तीन मिनिटे अश्‍लील फिल्म सुरू असल्याचे बोलले जात आहे. तक्रार केली नसती तर ही फिल्म सुरू राहिली असती असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणी आरपीएफने जाहिरात एजन्सीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. डीआरएम प्रभात कुमार यांनी एजन्सीला दंड ठोठावला असून या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. एवढेच नाही तर करार रद्द करण्याचे निर्देशही दिले आहेत.

यापूर्वीही अशीच घटना घडली आहे
पटना जंक्शनच्या जवळपास सर्व प्लॅटफॉर्मवर डझनभर टीव्ही स्क्रीन लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवाशांना ट्रेनची माहिती देता येईल. रविवारी घडलेली ही घटना पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी घटना समोर आली आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांना याबाबत नंतर कळाले होते, मात्र यावेळी माहिती मिळताच रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणामध्ये काही अधिकारी सकाळी ९.५६ ते ९.५९ या वेळेतच प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर ही घटना घडल्याचे सांगत आहेत, तर काही प्रवासी फलाट क्रमांक एकवरही अशी घटना घडल्याची चर्चा करत आहेत. आता याप्रकरणी एजन्सीच्या दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच एजन्सी मालकावरही कारवाई केली जाईल.

- Advertisement -

हेही वाचा – …म्हणून राहुल गांधींना ‘हीरो’ बनवले जातेय, ममता बॅनर्जी यांचा भाजपावर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -