Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Corona Virus: सोशल डिस्टन्सिंगवर अभ्यासकांचा नवा खुलासा, कोरोना संक्रमण रोखण्यास आता सोशल...

Corona Virus: सोशल डिस्टन्सिंगवर अभ्यासकांचा नवा खुलासा, कोरोना संक्रमण रोखण्यास आता सोशल डिस्टन्सिंग पुरेसे नाही

कोरोनाचा संसर्ग हा हवेतून होत असल्याचे सर्वत्र दिसून आले

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोना संसर्गाचा धोका निर्माण झाला तेव्हापासून सर्वांना मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा आणि मुख्य म्हणजे संसर्ग होऊ नये म्हणून दोन मीटरचे अंतर राखा म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा असे आपल्याला वेळोवेळी सांगण्यात येते. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळूनही कोरोनाचा धोका होऊ शकतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केवळ सोशल डिस्टन्सिंग पाळणे पुरेसे नाही असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे हा फॉर्म्युला तेव्हा तयार झाला होता जेव्हा बोलण्यातून, शिंकण्यातून किंवा खोकल्यामुळे तोंडातून आणि नाकातून ड्रॉपलेस्ट बाहेर पडून त्यापासून कोरोनाचे संक्रमण होते. मात्र आता कोरोनाचे संसर्ग हवेत रेंगाळणाऱ्या एरोसोल आणि लहान कणांनी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन कोरोनाचा संसर्ग होणार नाही असे म्हणता येत नाही, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.

केमिकल इंजिनिअरींग विभागाच्या मार्टिन झेड बाझंट यांच्यासह संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कोरोनाचा संसर्ग हा हवेतून होत असल्याचे सर्वत्र दिसून आले आहे. घरात कोरोनाचा धोका होणार नाही हे तुम्ही घरी किती वेळ असता, घरात किती वेळ मास्क लावता, घरातील जागा किती आहे त्याचप्रमाणे घरातील वेंटिलेशन किती आहे यावर अबलंबून आहे,असे पीएनएएसच्या जर्नलमध्ये म्हटले आहे. जास्त वस्ती नसलेल्या परिसरात कोरोना संसर्गाचा धोका कमी असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ज्या खोलीत व्हेंटिलेशन योग्य प्रमाणात असेल त्या खोलीत कोरोना संसर्गाचा धोका कमी आहे. मात्र जे सतत खोलीत असतात त्यांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. अभ्यासकांनी हवेतून संक्रमित होणाऱ्या एका सिद्धांतावर कोरोना संक्रमित व्यक्ती आणि कोरोना नसणाऱ्या व्यक्तीसोबत किती काळ राहू शकते याचा अभ्यास केला. घरातल्या घरात बोलणे,गाणे गाणे, श्वास घेणे यासारख्या श्वसनक्रियेमुळे श्वासातून येणारे ड्रॉपलेस्ट कसे काम करतात हे त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा – Covid vaccine : कोरोनाविरोधी लस घेण्यापूर्वी ‘हे’ दोन पदार्थ खाऊ नयेत, तज्ज्ञांचा सल्ला

- Advertisement -

 

- Advertisement -