ओदिशा : ओदिशामधील बोलंगीर या जिल्ह्यामध्ये एका 20 वर्षीय आदिवासी तरुणीला मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर त्या तरुणीच्या तोंडामध्ये मानवी विष्ठा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना बांगमुंडा पोलिस स्थानकाच्या हद्दीमध्ये जुराबांधा नामक गावात 16 नोव्हेंबरला घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Young woman was beaten tribal in odisha.)
हेही वाचा : Maharashtra Election 2024 : मुंबईत मुस्लिम मतदारांचा उत्साह, लोकसभेप्रमाणे आताही युतीला बसणार फटका?
ओदिशामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणाच्या काही नराधमांनी एका 20 वर्षीय आदिवासी मुलीला मारहाण करून तिला मानवी विष्ठा खाण्यास भाग पाडल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर तेथील स्थानिक आदिवासी संघटनांनी संताप व्यक्त केला असून वेगवेगळ्या भागांमध्ये निदर्शने करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सध्या पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणातील आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : PHOTO : हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री शिंदेंकडून शहीदांच्या स्मारकाला अभिवादन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी त्या आदिवासी महिलेच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन पिकाचे नुकसान करत होते. त्यासाठी त्या महिलेने विरोध केला होता. मात्र तिने विरोध केला या रागातून त्या आरोपींनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे समोर आले आहे. तसेच जबरदस्तीने तिच्या तोंडात मानवी विष्ठा टाकण्यात आली आहे. 16 नोव्हेंबरच्या दिवशी ही महिला तलावात आंघोळ करून घरी जात होती. त्यावेळी गावातील त्या आरोपींने आपल्यावर हल्ला केल्याचे तिने सांगितले आहे. या प्रकरणाची कसून चौकशी पोलिसांकडून सुरू असून या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या घटनेतील आरोपी सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (Young woman was beaten tribal in odisha.)
Edited By Komal Pawar Govalkar