घरदेश-विदेशआरोग्यमंत्र्यांवर पोलिसानेच केला गोळीबार; छातीत ४-५ गोळ्या झाडल्या, प्रकृती गंभीर

आरोग्यमंत्र्यांवर पोलिसानेच केला गोळीबार; छातीत ४-५ गोळ्या झाडल्या, प्रकृती गंभीर

Subscribe

हा हल्ला परफेक्ट प्लॅंनिगने करण्यात आला आहे. नब दास यांच्या अगदी जवळून गोळी झाडण्यात आली आहे.

ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. झारसुगुडा जिल्ह्यातील बृजराजनगरजवळ त्यांच्यावर एकापाठोपाठ ५ वेळा अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नबा दास यांच्यावर गोळीबार करणारा दुसरा कोणी नसून चक्क पोलीस अधिकारी आहे. एएसआय गोपाल दास असं या गोळीबार करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. ते गांधी चौक पोलीस चौकीत तैनात होते. गोपाल दासने आपल्या रिव्हॉल्वरने नबा दास यांच्यावर गोळीबार केला.

नबा दास यांच्या छातीत ४-५ गोळ्या लागल्या आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. येथेही एक रुग्णवाहिका सज्ज आहे, आरोग्यमंत्री भुवनेश्वरला पोहोचताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्री नबा दास हे एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बृजराजनगरमध्ये आले होते. ते कार्यक्रमाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. तेव्हा कोणीतरी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर एक पोलीस तिथून पळून जात असल्याचं दिसून आलं. हा हल्ला परफेक्ट प्लॅनिंगने करण्यात आला आहे. नबा दास यांच्या अगदी जवळून गोळी झाडण्यात आली आहे. या हल्ल्याने आरोग्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

- Advertisement -

नबा दास यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर सत्ताधारी पक्ष बीजदच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते निषेधार्थ संपावर बसले आहेत. आरोग्यमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना देण्यात आली आहे. नबा दास हे बीजेडीचे ज्येष्ठ नेते आहेत. अलीकडेच ते शनि मंदिरात १.७ किलो सोन्याचा कलश अर्पण केल्याने प्रसिद्धीझोतात आले होते.

नबा किशोर दास हे ओडिशातील झारसुखडा जिल्ह्यातील प्रभावशाली नेते आहेत. ते आधी काँग्रेसमध्ये होते, तेथून नबा दास यांनी बिजू जनता दलात प्रवेश केला. नवीन पटनायक यांनी त्यांच्या सरकारमध्ये आरोग्य विभागासारखे मोठे खाते त्यांच्यावर सोपवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -