घरताज्या घडामोडीOdisha: लखीमपूर घटनेची ओडिसामध्ये पुनरावृत्ती; MLAने गर्दीत घुसवली गाडी, ७ पोलीस कर्मचाऱ्यांसह...

Odisha: लखीमपूर घटनेची ओडिसामध्ये पुनरावृत्ती; MLAने गर्दीत घुसवली गाडी, ७ पोलीस कर्मचाऱ्यांसह २३ जण जखमी

Subscribe

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमधील घटनेची ओडिसामध्ये पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. ओडिसाच्या चिलिका विधानसभा क्षेत्रातील बीजू जनता दलचे (बीजद) निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांनी आपली गाडी निवडणुकीसाठी जमलेल्या गर्दीत थेट घुसवली. या दुर्घटनेमध्ये जवळपास २० जण जखमी झाले आहेत. यामध्ये कार्य बजावत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह ७ पोलीस गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आमदाराच्या गाडीची तोडफोड केली असून आमदाराला देखील मारहाण केल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

खुर्दा जिल्ह्याच्या बनपूर ब्लॉकमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांसोबत जवळपास ६०० ते ७०० लोकं जमले होते. यादरम्यान आमदार प्रशांत जगदेव ब्लॉकमध्ये पोहोचले आणि गाडी जबरदस्तीने गर्दी घसवून पुढे निघून गेले. ज्यामुळे तैनात असलेल्या ७ पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर २० लोकं जखमी झाले आहेत.

- Advertisement -

या घटनेनंतर घटनास्थळी असलेल्या संतप्त लोकांनी आमदाराच्या गाडीची पूर्णपणे तोडफोड केली. शिवाय यादरम्यान आमदाराला देखील जोरदार मारहाण केली आहे. यामुळे आमदार गंभीर जखमी झाले आहेत. आमदारासोबत असलेल्या इतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इतर राजकीय पक्षाचे जवळपास १५ समर्थक जखमी

माध्यमांसोबत बातचीत करताना खुर्दा जिल्ह्याचे एसपी आलेख चंद्र पाढी म्हणाले की, ‘या घटनेमध्ये ७ पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये बनपूर ठाणे पोलीस अधिकारी सामील आहे. याशिवाय या घटनेमध्ये विविध राजकीय पक्षांचे जवळपास १५ समर्थक जखमी झाले आहेत.’ या घटनेनंतर संतप्त लोकांना आमदाराला वाईट रित्या मारहाण केली आहे. सुरुवातीला आमदाराला जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्यानंतर त्यांना भुवनेश्वर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


हेही वाचा- मांसविक्रीची दुकाने दिसता कामा नयेत, राम राज्य हवयं- निवडून येताच भाजप आमदाराचा इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -