Homeक्राइमCrime : आधी सामूहिक बलात्कार, मग हत्या..., महिलेचा मृतदेह नदीपात्रात फेकला; गुजरातमधून...

Crime : आधी सामूहिक बलात्कार, मग हत्या…, महिलेचा मृतदेह नदीपात्रात फेकला; गुजरातमधून तिघांना अटक

Subscribe

सामुहिक बलात्कार करून महिलेचा मृतदेह नदी पात्रात फेकल्याची धक्कादायक घटना ओरिसातील कटक जिल्ह्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर महिलेच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या असून पीडित महिलेचा सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबई : सामुहिक बलात्कार करून महिलेचा मृतदेह नदी पात्रात फेकल्याची धक्कादायक घटना ओरिसातील कटक जिल्ह्यात घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर महिलेच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या असून पीडित महिलेचा सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या पीडित महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच, या घटनेचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी कंदरपूर पोलिस ठाण्यात सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासावेळी पोलिसांना एक महिलेजवळ एक चिट्ठी सापडली आणि संपूर्ण प्रकरणाची उकल झाली आहे. (odisha rape murder case police solved in filmy style accused arrested in gujarat)

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेचा मृत्यू झाला त्या महिलेची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण या प्रकरणाचा तपास सुरत येथे लागला आहे. त्यानुसार पीडित महिलेवर तीन भावांनी सामुहिक बलात्कार केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. जगन्नाथ उर्फ बापी सानिया देहुरी, मोठा भाऊ बलराम आणि चुलत अशा तीन भावांनी त्या महिलेची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. महिलेच्या हत्येप्रकरणी या तिनही भावांना कटक पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

कंदरपूर पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला पेंट जप्त केला होता. या पेंटवर ‘न्यू स्टार टेलर्स’ लिहिलेली स्लिप अडकलेली आढळली. ज्या स्लिपवर मेजरनेटचे आकडे गुजराती भाषेत टेलरने लिहिले होते. ओरिसा पोलिसांनी या प्रकरणाबाबत त्यांच्या परिसरातील पोलीस ठाण्यात स्लिप पाठवत टेलरचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला, पण पोलिसांना टेलरशी संबंधित कोणतेही यश आले नाही. त्याचवेळी पुन्हा ती स्लीप पाहिल्यास स्लिपवर गुजराती भाषेत लिहिलेले आकडे पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर कटकचे उपायुक्त जगमोहन मीना यांनी गुजरातमधील शहरे आणि जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त आणि उच्च अधिकाऱ्यांकडून मदत मागितली. त्यानंतर सुरतचे पोलिस आयुक्त अनुपम सिंह गेहलोत यांनी पीसीबीचे पोलिस निरीक्षक राजेश सुवेरा यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर पीसीबीचे पोलीस निरीक्षक राजेश सुवेरा हेड कॉन्स्टेबल अशोक लुणी यांना टेलरची स्लिप – New Star Tailor हे कळले. ही स्लीप सुरत शहरातील लिंबायत भागातील अंबानगर येथील एका टेलरच्या दुकानातील होती.

- Advertisement -

स्लीपची माहिती मिळताच पोलिसांनी सुरत गाठत टेलरची चौकशी केली. त्यावेळी या स्लीपवरील लिखाण आपले असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्या महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना सोपं झालं. त्यानुसार, स्लीपवर लिहिलेला मजकूर पाहून टेलरने त्याच्या मोजमाप पुस्तकात तपासले असात, त्याला कार्बन कॉपी केलेल्या स्लिपमध्येही तारीख सापडली. त्यावेळी त्या स्लीपवर ग्राहकाचे नाव व पत्ता नसल्याने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यावेळी ओरिसा येथील एका व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज आढळले. हे सीसीटीव्ही फुटेज दिवाळी पूर्वीचे असून दिवाळीनिमित्त कपडे शिवण्यासाठी एक ग्राहक असल्याचे त्यात दिसले. ज्याने कपडे खरेदी केले, त्याने टेलरिंगचे पैसे देण्यासाठी त्याच्या मित्राकडून 100 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर घेतले होते. त्या व्यवहाराच्या मदतीने पोलिसांचे पथक त्या मित्रापर्यंत पोहोचले. त्याठिकाणी पोहोचल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास उघड झाला.


हेही वाचा – Uttam Jankar : ईव्हीएम घोटाळ्यात मोहित कंबोज यांचा हात; 120 चा अर्थ काय? उत्तम जानकरांचा गंभीर आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -