Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Odisha Train Accident: भीषण अपघाताच्या 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांकडून हात...

Odisha Train Accident: भीषण अपघाताच्या 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना; रेल्वेमंत्र्यांकडून हात जोडून प्रार्थना

Subscribe

नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर येथील भीषण अपघाताच्या तब्बल 51 तासांनंतर पहिली ट्रेन रवाना झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला. ज्या रेल्वे ट्रॅकवर भीषण अपघात झाला होता, त्याच ट्रॅकवरून मालगाडी रवाना झाली आहे. ही गाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे रवाना झाली आहे. यावेळी अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि रेल्वे अधिकारी उपस्थित होते. (Odisha Train Accident: First train leaves after 51 hours of horrific accident; Prayer with folded hands from Railway Minister)

तब्बल दोन दिनसांनी अपघातग्रस्त परिसरातून ट्रेन रवाना झाली आहे. या ट्रेनचा व्हिडीओही आता समोर आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या व्हिडीओमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. बयाना रेल्वे स्थानकावरुन ट्रेन रवाना होताच  अश्विनी वैष्णव यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना हस्तांदोलन केले आणि त्यानंतर ट्रेनकडे पाहुन हात जोडत प्रार्थना केल्याचे दिसत आहे. प्रार्थना करताना अश्विनी वैष्णव यावेळी काहीसे भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

- Advertisement -

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेन रवाना होताना दिसत आहे. यानंतर रेल्वेमंत्री भारत माता की जयआणि वंदे मातरमअशा घोषणा देताना दिसत आहेत. त्यानंतर ते याठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आभार मानताना दिसत आहेत. रेल्वे मंत्र्यांनी ट्वीट करताना म्हटले की, अपघातग्रस्त डाऊन लाईन सुरू करण्यात आली आहे. या परिसरातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. यानंतर त्यांनी आणखी एक ट्वीट करत अपलाईनवरही ट्रेनची वाहतूक सुरू झाल्याची माहिती दिली आहे. 

- Advertisement -

बालासोरमध्ये भीषण रेल्वे अपघात
दरम्यान, कोरोमंडल एक्स्प्रेस शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बालासोर येथील बहनगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ मुख्य मार्गाऐवजी लूप लाईनमध्ये गेल्यामुळे तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. यानंतर कोरोमंडलवर बंगळुरूहावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस जाऊन धडकली. या भीषण अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे, 900 हून अधिकजण जखमी झाले आहेत. 

 

- Advertisment -