घरदेश-विदेशOdisha Train Accident : सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका; निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी

Odisha Train Accident : सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका; निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी

Subscribe

 

नवी दिल्लीः Odisha Train Accident ची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. २ जून २०२३ रोजी हा अपघात झाला. या अपघतात २८८ जणांचा बळी गेला तर एक हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

- Advertisement -

Shalimar-Chennai Central Coromandel Express आणि Bengaluru-Howrah Superfast Express ला अपघात झाला. या भीषण अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. या अपघाताची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका Adv विशाल तिवारी यांनी केली आहे.

हेही वाचाःराजीनाम्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी फटकारले

- Advertisement -

या अपघाताची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षततेखील तज्ज्ञ समिती नेमावी. या समितीने अपघाताचा धोका आणि सुरक्षेचे उपाय सांगावे. अपघाताचे नेमके कारण काय आहे याचा अभ्यास समितीने करावा. भविष्यात असा अपघात होणार नाही यासाठी या समितीने उपाय सुचवावेत. Automatic Train Protection (ATP) प्रणाली अमंलात आणावी, अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.

याआधीही रेल्वे अपघात झाले आहेत. केंद्र सरकारने या अपघातांचीही चौकशी केली होती. तरीही त्यातून केंद्र सरकारने काही धडा घेतलेला नाही. त्यामुळे आता न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज आहे. कारण हा जनहिताचा मुद्दा आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. कोणत्याही देशात जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. अशा घटना घडल्यानंतर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. गाड्या उशिराने धावतात. याचा नाहक त्रास अन्य प्रवाशांना होतो. रेल्वे अपघातामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसाने होते. हे नुकसान म्हणजे जनतेने करातून भरलेल्या पैशांचे नुकसान आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

 

अपघाताचे रेल्वेने दिले ‘हे’ कारण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -