Video: ओडिशात सापडला दुर्मिळ जातीचा कासव; रंग तर पहा

ओडिशात दुर्मिळ जातीचा कासव सापडला असून या कासवाचा रंग पाहुन तुम्हालाही सोन्याचा असल्याचे वाटले.

odisha yellow colored rare turtle forest department
Video: ओडिशात सापडला दुर्मिळ जातीचा कासव; रंग तर पहा

आतापर्यंत आपण अनेक दुर्मिळ जातीचे कासव पाहिले आहेत. मात्र, ओडिशामध्ये एक असा कासव आढळून आला आहे ज्याच्या रंग पाहुन तो सोन्याचा असल्यासारखे वाटत आहे. ओडिशामधील बालेश्वर जिल्ह्यातील सुजानपूर गावात स्थानिक लोकांना एक सोन्याच्या रंगाचा कासव आढळून आला आहे. या दुर्मिळ जातीच्या कासवाला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

‘हा अत्यंत दुर्मिळ जातीचा कासव असून मी यापूर्वी कधीही असा कासव पाहिलेला नाही’. – बी आचार्य; वन्यजीव वॉर्डन

सामान्यत: कासव हे तपकिरी रंगाचे आढळतात. मात्र, हा आढळलेला कासव सोनेरी रंगाचा असून हा दुर्मिळ कासव आहे. कदाचित हा कासव कोणी पाहिलेला देखील नसावा. सध्या या कासवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

बालेश्वर जिल्ह्यातील साजनपूर गावात वासुदेव महापात्र नावाच्या शेतकऱ्याच्या जमिनीवर हा कासव सापडला आहे. रविवारी वासुदेव आपल्या शेतात काम करत असताना त्यांना हा कासव आढळला. त्यानंतर त्यांनी हा कासव आपल्या घरी आणला. हा कासव पाहण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.


हेही वाचा – Corona Update: राज्यात २४ तासांत ८,२४० नवे रूग्ण; १७६ जणांचा मृत्यू