आधी १४ दिवस आणि नंतर ७ दिवस ‘तो’ झाला स्वत:च्या कारमध्येच क्वारंटाईन कारण…

कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. आणि त्याचा सर्वाधिक परिणाम भारतावरही झाला आहे. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. इतर राज्यातून येणाऱ्या लोकांमुळे प्रवास करून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र आता क्वारंटाईन सेंटरही पुरेनाशी झाली आहेत. पण ओडिशामध्ये एक वेगळाच प्रकार घडला आहे. ओडिशामध्ये चक्क एका व्यक्तीला त्याच्या कारमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

ओडिशामधील सुनखेमुंडी ब्लॉक येथे राहणारे ३० वर्षीय माधब पात्रा डिजिटल प्रिंटिंग युनिटचे मालक आहेत. माधव १५  मार्चला आपल्या व्यवसायाशी संबंधित काही कामासाठी बिहारला गेला होता तिथे अचानक लॉकडाऊनमुळे तो अडकला.  माधबने ९ मेला ओडिशाला परतण्यासाठी राज्य सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर आपले नाव नोंदवले आणि परत येण्याबाबत बेरहामपूर (ओडिशा) महानगरपालिकेलाही माहिती दिली.

ओडिशात परत आल्यावर माधब बेरहमपूरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये १४ दिवस क्वारंटाईन होता. त्यानंतर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र घरी परत आल्यावर गावातील लोकांनी त्याला कारमध्येच क्वारंटाईन राहण्यास भाग पाडले. गावातील लोकांच्या हट्टामुळे त्याला एका आठवड्यासाठी कारमध्ये एकटे रहावे लागले.

खरतर त्याला प्रशासनाकडून घरी जाण्यासही परवानगी देण्यात आली, पण एका आठवड्यासाठी त्याला क्वारंटाईन ठेवण्यासाठी घरात राहण्यास सांगण्यात आले. यानंतर जेव्हा तो आपल्या गाडीतील डोलाबा गावात पोहोचला तेव्हा त्याला लोकांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला.

माधब म्हणाला की, गावातील लोकांनी मी परत आल्यावर माझ्या वडिलांना त्रास दयायला सुरूवात केली.  यामुळे गावकऱ्यांशी वाद देखील झाला. हा मुद्दा पाटापूर पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला,  त्यांनीही हा विषय सरपंचांसमोर उपस्थित केला, परंतु तरीही त्यांना त्यांच्या गाडीत ७ दिवस क्वारंटाईन व्हावे लागले.


हे ही वाचा – सोनूने शेअर केला नंबर, कोण म्हणतय गर्लफ्रेंडला भेटायचय तर, कोणी म्हणालं….