घरदेश-विदेशप्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे महाराजा

प्रिन्स चार्ल्स तिसरे ब्रिटनचे नवे महाराजा

Subscribe

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर आज त्यांचे सुपुत्र राजा चार्ल्स तिसरे यांनी अधिकृतपणे ब्रिटनच्या महाराजा पदी शपथ घेतली आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सेंट जेम्स पॅलेस येथील अॅक्सेसेशन कौन्सिलच्या बैठकीत किंग यांची ब्रिटनचे नवे महाराजा म्हणून घोषणा करण्यात आली आहे. ब्रिटनच्या सेंट जेम्स पॅलेस येथे हा शपथविधी सोहळा पार पडला आहे.

महाराणी एलिझाबेथ या गेली सात दशके ब्रिटनच्या महाराणी म्हणून कार्यरत होत्या. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर ब्रिटिश राजघरण्याच्या नियमाप्रमाणे प्रिन्स चार्ल्स यांची महाराजा पदी निवड करण्यात आली आहे. किंग चार्ल्स यांची महाराजा पदाच्या शपथविधी सोहळ्यास क्वीन कॉन्सोर्ट कॅमिला, प्रिन्स ऑफ वेल्स विल्यम, पंतप्रधान लिझ ट्रस आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्रिटनचे नवे सम्राट म्हणून महाराजा चार्ल्स तिसरे शुक्रवारी प्रथमच बकिंगहॅम पॅलेसवर दाखल झाले होते.

- Advertisement -

किंग चार्ल्स हे पत्नी कॅमिलासह लंडनला परतले आहेत. याठिकाणी त्यांनी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान लिझ ट्रस यांची भेट घेतली, यावेळी प्रिन्स चार्ल्स यांनी महाराजा या नात्याने ब्रिटन जनतेला पहिल्यांदाच संबोधित केले, यावेळी किंग चार्ल्स यांनी आई एलिझाबेथ द्वितीय यांचे आभार मानत आयुष्यभर जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली. तसेच बकिंगहम पॅलेसबाहेर उपस्थित लोकांचीही त्यांनी भेट घेतली, यावेळी जनतेच्या शोकसंवेदना स्वीकारत त्यांनी आई एलिझाबेथ यांच्याप्रमाणे आपण का करु असे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

चार्ल्स यांनी आज महाराजा म्हणून शपथ घेतली असली तरी त्यांचा राज्याभिषेक सोहळा अद्याप बाकी आहे. लवकरचं चार्ल्स यांचा राज्यभिषेक पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जात असून या सोहळ्याचे विशेष नियोजन केले जाते. या राज्याभिषेक सोहळ्यासाठी ब्रिटनच्या सर्व माजी पंतप्रधान, ज्येष्ठ खासदार, इतर अधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्रातही लागू होणार ‘मुख्यमंत्री किसान योजना’; शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक लाभ

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -