Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अरे वा! चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी चित्र; प्रज्ञान रोव्हरने पाठविली मोठी अपडेट

अरे वा! चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी चित्र; प्रज्ञान रोव्हरने पाठविली मोठी अपडेट

Subscribe

चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान आता तेथून नवनवीन अपडेट असतानाच चंद्रावर विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरचे हलके फुलके छायाचित्रही इस्रोने आतापर्यंत शेअर केले आहेत.

बंगळुरू : भारतीय आंतरराळ संशोधन संस्था (इस्रो) ने मोठी कामगिरी करत चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर पाऊल ठेवले होते. आता तेथूनच रोज नव-नवीन अपडेट प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लॅंडर पाठवत आहे. अशातच आता प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचे टिपलेले थ्रीडी छायाचित्र इस्रोला पाठवले असून, इस्रोने ते त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केले आहे.(Oh wow! 3D image of lunar surface; Big update sent by Pragyan Rover)

चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. दरम्यान आता तेथून नवनवीन अपडेट असतानाच चंद्रावर विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरचे हलके फुलके छायाचित्रही इस्रोने आतापर्यंत शेअर केले आहेत. यादरम्यानच आता इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रज्ञान रोव्हरच्या मदतीने एका खास तंत्राद्वारे काढलेले थ्रीडी अ‍ॅनाग्लिफ (Anaglyph) नावाचे छायाचित्र सर्वांसाठी जारी केले आहे. इस्रोने पाच सप्टेंबर रोजी ट्विटर हँडलवर चंद्राच्या पृष्ठभागाचे थ्रीडी छायाचित्र शेअर केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : कोल्हापूर बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प; आंदोलनात सर्वसामान्य मैदानात

पहिल्यांदाच अॅनाग्लिफ पद्धतीचा अवलंब

- Advertisement -

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडे अत्याधुनिक तंत्रज्ज्ञान असून, या तंत्रज्ज्ञानाचा त्यांनी चांद्रयान-3 मोहीमेसाठी पुरेपूर वापर केल्याचे बघायला मिळत आहे. कारण, पाच सप्टेंबर रोजी इस्रोने शेअर केलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या थ्रीडी छायाचित्रासाठी प्रज्ञान रोव्हरने खास अॅनाग्लिफ या पद्धतीचा अवलंब केला आहे. इस्रोच्या इलेक्ट्रो-ऑप्टिक सिस्टम्स प्रयोगशाळेकडून विकसित करण्यात आलेल्या नॅवकॅम (NavCam) नावाच्या तंत्रज्ज्ञाचा वापर करून रोव्हरने ही अॅनाग्लिफ प्रतिमा तयार केली आहे.

हेही वाचा : चोरांचे सरदार दिल्लीत सरकार चालवत आहेत…, ठाकरे गटाचे भाजपावर जोरदार टीकास्त्र

असे पहा ते थ्रीडी छायाचित्र

प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागाचे पाठवलेले थ्रीडी छायाचित्र पाहण्यासाठी थ्रीडी चष्म्यातून चित्र पहावे लागणार आहे. यातून ते छायाचित्र पाहिल्यास हे चित्र आणखी सुंदर दिसेल, अशी माहितीही इस्रोने दिली आहे. तर इस्रोने स्पष्ट अ‍ॅनाग्लिफ हे स्टिरिओ किंवा मल्टी व्ह्यू प्रतिमांमधून निर्माण झालेले थ्रीडी दृश्य आहे.

- Advertisment -