घरट्रेंडिंगOil India Recruitment 2021: 'या' १२० जागांवर भरती; दरमहा ९० हजारापर्यंत मिळणार...

Oil India Recruitment 2021: ‘या’ १२० जागांवर भरती; दरमहा ९० हजारापर्यंत मिळणार पगार

Subscribe

ऑइल इंडियाने ज्यूनिअर असिस्टेंट (क्लर्क कम कंप्यूटर ऑपरेटर) या पदावर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार oil-india.com च्या अधिकृत वेबसाइटवर कनिष्ठ सहाय्यक म्हणजे ज्यूनिअर असिस्टेंट पदासाठी 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.या भरतीद्वारे कनिष्ठ सहाय्यकाची 120 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये जनरल कॅटेगरीची 54 पदे, अनुसूचित जातीची 8 पदे, एसटीची 14 पदे, ओबीसीची 32 पदे आणि ईडब्ल्यूएसची 12 पदे समाविष्ट आहेत. या पदांवरील निवड झालेल्या उमेदवारांना ग्रेड 3 अंतर्गत 26,600 ते 90,000 रुपये पगार देण्यात येणार आहे.

अशी आहे वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी शासनाने मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून कोणत्याही विषयात 40% गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त कंप्यूटर एप्लीकेशन किमान 6 महिने डिप्लोमा / प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराला संगणकाचे चांगले ज्ञान असले पाहिजे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या जनरल कॅटेगरीतील उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे असणे आनिवार्य आहे. तर, अनुसूचित जाती / जमातीसाठी 18 वर्षे ते 35 वर्षे आणि ओबीसीसाठी 18 वर्षे ते 33 वर्षे वयोमर्यादा देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत सूचना पाहू शकतात.

- Advertisement -

ही आहे शेवटची तारीख

संगणक आधारित चाचणी (CBT) च्या आधारे Oil India Junior Assistant Recruitment 2021 साठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवार ऑईल इंडिया लिमिटेड, oil-india.com च्या अधिकृत वेबसाइटद्वारे 15 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी जनरल / ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज फी भरावी लागेल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.

- Advertisement -

Telegram New Features: आता व्हॉट्सॲप प्रमाणे टेलीग्रामवर करु शकतो ग्रुप व्हिडिओ कॉल

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -