घरCORONA UPDATE१२ रूग्णालयांनी प्रवेश नाकारल्यामुळे ५० वर्षीय महिलेचा मृत्यू!

१२ रूग्णालयांनी प्रवेश नाकारल्यामुळे ५० वर्षीय महिलेचा मृत्यू!

Subscribe

बेडच्या कमतरतेमुळे एका महिलेला बेडच्या कमतरतेमुळे १२ रूग्णालयांनी प्रवेश नाकारला. त्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. तीन दिवस हे कुटुंब १२ रूग्णालयात फिरले. मात्र बेड नसल्याचे सांगत या महिलेला कोणीही अॅडमिड करून घ्यायला तयार नव्हते. या माहिलेचा नवरा बाबू म्हणाला की, ‘तीन दिवसांत आम्ही १२ रुग्णालयांना भेट दिली. यामध्ये व्हिक्टोरिया हॉस्पिटल व इतर खाजगी सुविधांचा समावेश होता. बेड्यांची कमतरता असल्याचे सांगून या सर्वांनी अॅडमिट करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर अखेर शनिवारी केसी जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र काही मिनिटांतच या महिलेचा मृत्यू झाला.

या आधी मंजुनाथ या ३५ वर्षीय व्यक्तीचेही शनिवारी तीन दिवस तापाने तापाने खालून निधन झाले आणि बेडच्या कमतरतेमुळे कित्येक रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला. त्यांची प्रकृती अधिकच बिकट झाल्याने त्यांच्या पत्नीने शनिवारी निधन झाले होते. त्यांनाही अनेक रूग्णालयांनी बेड नसल्याचे कारण देत दाखल करून घेण्यास नकार दिला. अखेर तीन दिवसानंतर त्यांना एका हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला पण लगेचच त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळपास १ दिवसांनी त्याचा कोरोना रिपोर्ट आला. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सगळीकडे भितीचे वातावरण पसरले. कारण तो मृतदेह एक दिवस घरातच होता. आता आजूबाजूच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.


हे ही वाचा – पावसामुळे बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल, विश्रांतीगृहात शिरलं पाणी!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -