कॉंग्रेस ने देशाला फसवलं म्हणत, जे.पी.नड्डांनी विचारले सोनिया गांधींना ‘हे’ दहा प्रश्न!

j p nadda

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजीव गांधी फाउंडेशनबाबत कॉंग्रेसवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.  जेपी नड्डा म्हणाले की, सोनियाजींना सांगायचे आहे की कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूळ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि आपल्या सीमांचे रक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे आणि देश सुरक्षित आहे. १३० कोटी देशवासियांना हे जाणून घ्यायचे आहे की सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केलं? आणि देशाच्या नागरिकांचा कसा विश्वासघात केला?

याबरोबर त्यांनी अनेक प्रश्न काँग्रेसला विचारले आहेत.  राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीनचा काय संबंध?  फाऊंडेशनचा कारभार आरटीआय अंतर्गत का नाही?  पंतप्रधान फंडातून राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? मेहूल चॉक्सीसा कर्ज का दिलं?  राजीव गांधी सरकाराला चीनकडून का पैसा मिळाला? चीनसोबतचे व्यवहार का वाढवले?  असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.