घरताज्या घडामोडी'चीनी सैनिकांच्या तंबूला आग लागली आणि सैन्यामध्ये संघर्ष झाला'

‘चीनी सैनिकांच्या तंबूला आग लागली आणि सैन्यामध्ये संघर्ष झाला’

Subscribe

गलवान येथे झालेल्या भारत – चीन संघर्षावर माजी संरक्षण मंत्री व्हीके. सिंह यांनी दावा केला आहे की, त्या दिवशी चिनी सैनिकांच्या तंबुला अचानक आग लागली. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आणि सैनिकांमध्ये हिंसक चकमक उडाली. चिनी सैनिकांनी तंबूत काय ठेवले होते, हे सांगणे कठीण आहे ज्यामुळे आग लागली. व्हीके सिंग यांचा हा दावा आतापर्यंतच्या अंदाजापेक्षा काहीसा वेगळा आहे. आतापर्यंत असे म्हटले जात होते की चिनी सैन्याने माघार घेतली नाही तेव्हा दोन्ही बाजूंच्या सैनिकांमध्ये चकमक झाली.

चीनने पेट्रेल पॉईंटमधून तंबू हटवला नसल्याच्या वादावरून व्ही. के. सिंह म्हणाले की, १५ जूनच्या रात्री कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू पेट्रोल पॉईंट वर पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की चीनने तेथून तंबू हटवले नाहीत. त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत तंबू काढले जातील असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र भारतीय सैन्य मागे गेलं का हे पाहण्यासाठी चीनने तंबू उभारले होते. संतोष बाबूंनी चिनी सैनिकांना तंबू काढायला सांगितले. मात्र अचानक आग लागल्यामुळे चिनी सैनिक तंबू हटवत होते. चिनी लोकांनी तंबूत काय ठेवले होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सिंग म्हणाले की, त्यानंतरच सैनिकांमध्ये वाद झाला जो नंतर हिंसक संघर्षात बदलला.

- Advertisement -

लष्करप्रमुख म्हणाले की या चकमकीच्या वेळी चिनी सैन्याने अधिक सैनिक बोलावले. यावर भारताने देखील आपल्या अतिरिक्त सैनिकांना बोलावले. ते म्हणाले की, दोन्ही बाजूंमध्ये हिंसक चकमक झाली, त्यात भारतीय बाजूचे २० सैनिक शहीद झाले. त्याचवेळी या घटनेत ४३ चिनी नागरिकांचा मृत्यूही झाला. ते म्हणाले की चिनी सैनिकांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त असू शकते. व्ही.के.सिंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, पेट्रोलिंग पॉईंट १४ येथील गलवान नदीचे सात ते आठ किलोमीटर क्षेत्र आहे. पेट्रोलिंग पॉईंट १४ चे क्षेत्र १९६२ पासून भारताकडे आहे.

सिंह पुढे बोलताना म्हणाले की, श्योक नदीकाठी रस्ता तयार झाला तेव्हा हा वाद सुरू झाला. हा रस्ता दौलत बेग ओल्डीकडे जातो. आधी सांगितले की येथून जाण्यासाठी पूर्वी १५ दिवस लागतात, पण रस्ता बनल्यानंतर हे अंतर दोन दिवसात पूर्ण करता येईल. केंद्रीय मंत्री म्हणाले की, चिनी सैनिकांना हा रस्ता दिसला नाही, त्यानंतर चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश केला आणि तंबू उभारले. चिनी सैनिकांच्या या कारवाईवर भारतीय सैनिकांनी त्याला रोखले.

- Advertisement -

हे ही वाचा – पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले; जाणून घ्या आजचे दर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -