घरताज्या घडामोडीपोलिसांनी गांधीगिरीने जिंकलं; हिंसक जमावापुढे टेकले गुडघे, आंदोलकांनी घेतली गळाभेट!

पोलिसांनी गांधीगिरीने जिंकलं; हिंसक जमावापुढे टेकले गुडघे, आंदोलकांनी घेतली गळाभेट!

Subscribe

पोलीस म्हटलं की पहिल्यांदा लोकांच्या मनात निर्माण होते ती भावना म्हणजे भितीची! आणि त्यातही ते अमेरिकेतले पोलीस म्हटलं की त्यांची कोण दहशत! अमेरिकेच्या ओक्लाहोमामध्ये एका कृष्णवर्णी व्यक्तीचा अमेरिकी पोलिसांच्या कारवाईत झालेला मृत्यू सध्या अमेरिकेत मोठा चर्चेचा विषय ठरला असून अमेरिकेतल्या तब्बल ४० शहरांमध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या शहरांमध्ये कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. या व्यक्तीच्या मानेवर ५ मिनिटं एका अमेरिकन पोलिसाने गुडघा दाबून ठेवल्यामुळे श्वास कोंडून त्याचा मृत्यू ओढवला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकन पोलिसांनी आज ओक्लाहोमा शहरामध्ये केलेली गांधीगिरी जगासमोर एक वेगळाच आदर्श ठेऊन गेली!

नक्की काय प्रकार आहे हा?

जॉर्ज फ्लॉईड नावाच्या कृष्णवर्णी व्यक्तीचा अमेरिकेच्या ओक्लाहोमामधल्या पोलिसांच्या हातून मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये बहुतांश कृष्णवर्णी असले, तरी त्यात गौरवर्णी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. पोलिसांकडून दाखवण्यात आलेल्या या वंशभेदी आणि वर्णभेदी वागणुकीचा निषेध आंदोलक करू लागले. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. थेट वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसच्या बाहेरपर्यंत या जाळपोळीचं लोण पोहोचलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना छुप्या बंकरमध्ये जावं लागलं. सर्वच ठिकाणी आंदोलकांकडून अमेरिकन पोलिसांचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी ओक्लाहोमा जेलच्या बाहेर मोठ्या संख्येने आंदोलक जमा होऊन निदर्शनं करू लागले.

- Advertisement -

ओक्लाहोमा जेलच्या बाहेर पोलीस फौजफाटा तैनात होताच. त्यामुळे आंदोलकही लाठ्याकाठ्या, अश्रूधुराच्या नळकांड्या, प्रसंगी फायरिंगसाठी तयार होते. जीव तोडून निदर्शनं केली जात होती. पण समोरचं दृश्य पाहून आंदोलकही काही काळ थक्क झाले आणि निदर्शनांचा सूर शांत होऊ लागला. नेहमी हात उगारून आक्रमक दिसणारे ओक्लाहोमा पोलीस आज आंदोलकांसमोर गुडघे टेकून बसले होते. हात एकमेकांवर ठेवले होते. आणि त्यांच्या नजरा खाली झुकलेल्या होत्या. ती कृती जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूबद्दल संवेदना, सहवेदना आणि आंदोलकांच्या भावना समजून घेत असल्याची प्रतीक होती.

- Advertisement -

आंदोलकांनाही काही क्षणांत पोलिसांच्या या भावना समजल्या आणि आंदोलकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. आनंद व्यक्त करायला सुरुवात केली. गाणी गायला सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याने समोर येऊन एका कृष्णवर्णी आंदोलकाशी हस्तांदोलन करून त्याची गळाभेट देखील घेतली. आंदोलन निवळलं. काही क्षणांपूर्वी आक्रमक झालेला जमाव आता गाणी गात होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य होतं.

ती एक नि:शब्द कृती!

ओक्लाहोमा पोलिसांनी समस्त जगासमोर एक नवाच आदर्श आज घालून दिला आहे. आंदोलकांना नेहमीच लाठ्याकाठ्या किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी शांत करता येतं असं नाही. त्यांना तुमच्या एका नि:शब्द कृतीतून देखील समजावलं जाऊ शकतं, हेच या घटनेतून स्पष्ट झालं. एकीकडे जॉर्जला गुडघ्याने दाबून मारणारं ओक्लाहोमा पोलिसांचं रूप आणि दुसरीकडे गुडघ्यावर बसून नि:शब्द माफी मागणारं त्याच पोलिसांचं दुसरं रुप या निमित्ताने जगानं पाहिलं! बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते आणि माजी राज्यसभा सदस्य प्रीतीश नंदी यांनी देखील हाच मुद्दा अधोरेखीत करणारं एक ट्वीट देखील केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -