ओलामध्ये १००० कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ? अनेक उपकंपन्याही बंद

६ जुलैपासून कामाचं मूल्यांकन सुरू झाले असून ४०० ते ५०० कर्मचारी काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सुत्रांनी सांगितल्यानुसार जवळपास १००० कर्मचारी काढून टाकण्यात येणार आहेत.

वाहतूक सेवा पुरवणाऱ्या ओला कंपनीत (Ola Cab) कर्मचारी कपात करण्यात येत आहे. ज्या कर्मचाऱ्यांची खराब कामगिरी आहे त्यांना कंपनीकडून राजीनामा देण्यास सांगण्यात येत आहे. ६ जुलैपासून कामाचं मूल्यांकन सुरू झाले असून ४०० ते ५०० कर्मचारी काढून टाकण्यात येणार आहे. मात्र, सुत्रांनी सांगितल्यानुसार जवळपास १००० कर्मचारी काढून टाकण्यात येणार आहेत. (Ola Cabs planning to lay off employees?)

एकीकडे इलेक्ट्रिक उत्पादन व्यवसायासाठी ओला कंपनीने भरती सुरू केली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक मोबिलिटीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. तसंच, अनेकांची पगारवाढही रोखली आहे.

हेही वाचा – अबब! ग्राहकाला आले तब्बल ३ हजार कोटींचे वीजबिल

अनेक उपकंपन्या केल्या बंद

ओलासारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीने विविध उपकंपन्या सुरू केल्या होत्या. मात्र, अल्पावधीतच या कंपन्या ओलाला बंद कराव्या लागल्या. आता ओलाने इलेक्ट्रिक व्हेहिकल सेगमेंटवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक उपकंपन्या बंद करत आहेत. युज्ड कार सेल करणारी ओला डॅश ही कंपनीही बंद करण्यात आली आहे. तर, क्विक कॉमर्स कंपनीही बंद झाली आहे. २०१५ मध्ये ओला कॅफेस सुद्धा बंद पडले होते.

हेही वाचा – युजर्ससाठी व्हॉट्सअॅपचे नवे फीचर; ‘डिसएपियरिंग’मध्ये मोठा बदल

इलेक्ट्रिक स्कूटरच्या महसुलात वाढ

दरम्यान, ओला कंपनीने एप्रिल ते मे २०२२ मध्ये इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीमध्ये ५०० कोटींचा महसूल मिळवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरिस हा महसूल एक अब्ज डॉलर्स म्हणजेच ७८३४ कोंटीचा महसूल मिळवणू असं कंपनीने म्हटलं आहे.