Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Ola Electric Scooter कारखान्यात महिला राज,10 हजार महिलांची होणार भर्ती

Ola Electric Scooter कारखान्यात महिला राज,10 हजार महिलांची होणार भर्ती

ओला कंपनीची नव्या स्कूटरची विक्री 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. यामध्ये, त्या लोकांना प्राधान्य दिले जाईल ज्यांनी यापूर्वी 499 रुपयांमध्ये बुकींग केले आहे.

Related Story

- Advertisement -

यावर्षी 15 ऑगस्ट रोजी इलेक्ट्रिक स्कूटर (ola electric scooters)लॉन्च करणाऱ्या ओला कंपनीने त्यांच्या निर्मितीसाठी 10,000 महिला कर्मचाऱ्यांसह एक विशेष कारखाना उभारण्याची घोषणा केली आहे. त्याचे संपूर्ण कामकाज महिलांच्या हाती देण्यात येणार आहे.(Ola making all women factory for electric scooters production)

ओला कंपनीच्या मते, आत्मनिर्भर भारतासाठी आत्मनिर्भर महिलांची गरज आहे. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “आज मला घोषणा करताना अभिमान वाटतो की ओला फ्यूचर फॅक्टरी पूर्णपणे महिलांद्वारे चालवली जाईल. आम्ही या आठवड्यात या कार्यशक्तीच्या पहिल्या तुकडीचे स्वागत केले आणि जेव्हा कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होईल तेव्हा 10हजार महिला या कारखान्यात कार्यरत असतील. मला फक्त ओला वुमन फॅक्टरी आणि जगातील अशा पहिल्या कारखान्याची घोषणा करताना अभिमान वाटत आहे.”

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा दर
- Advertisement -

ओलाने दोन इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 pro लॉन्च केले आहेत. यामध्ये Ola S1 ची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आणि Ola S1 pro ची किंमत 1,29,999 रुपये इतकी असणार आहे.

कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस

भविश अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ट्विटमध्ये लिहले होते की की ,कंपनीने ओला एस 1 ची खरेदी पूर्णपणे डिजीटल केली आहे. अगदी कर्जाची कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस केली गेली आहे. आमच्या ग्राहकांना या प्रकारचा डिजिटल खरेदीचा अनुभव देण्याचे आमचे ध्येय आहे.

- Advertisement -

15 सप्टेंबरपासून सुरू होणार विक्री

आता ओला कंपनीची नव्या स्कूटरची विक्री 15 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होईल. यामध्ये, त्या लोकांना प्राधान्य दिले जाईल ज्यांनी यापूर्वी 499 रुपयांमध्ये बुकींग केले आहे. या खरेदी दरम्यान, ग्राहकांचे रजिस्ट्रेशन आणि त्यांची खरेदी लाइन पूर्वीप्रमाणेच राहील. तर डिलिव्हरीची तारीख देखील तीच राहील.


हे हि वाचा – प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोना रुग्णांची वाढली चिंता! मृत्यूच्या प्रमाणातही वाढ

- Advertisement -