Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Ola S1 Air लवकरच होणार लाँच; कंपनीच्या सीईओनी ट्विटद्वारे दिली माहिती

Ola S1 Air लवकरच होणार लाँच; कंपनीच्या सीईओनी ट्विटद्वारे दिली माहिती

Subscribe

नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्यामुळे ओलाने (OLA) आपले नवीन प्रोडक्ट Ola S1 Air  लवकरच मार्केटमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

ओलाने लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air ऑक्टोबर 2022 मध्ये लॉन्च केली होती. या स्कूटरची किंमत जवळपास 84,999 रुपयांपासून सुरू होते आणि एक्स-शोरूम 109,000 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे ही गाडी विकत घेणाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. Ola S1 Air ची डिलिव्हरी जुलै 2023 मध्ये सुरू होणार आहे. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल ट्विटरमध्ये पोस्ट केलेल्या फोटोमध्ये Ola S1 Air वर बसलेले दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, पहिल्यांच Ola S1 Air ची टेस्ट ड्राइव्ह घेतली असून ती आवडली आहे. जुलैमध्ये ही स्कूटर तुमच्या भेटीला येत आहे. अलीकडेच कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर Ola S1 Air या इलेक्ट्रिक स्कूटरचा टीझर जारी केला होता.

- Advertisement -

Ola S1 Air इलेक्ट्रिक स्कूटरचे तिन्ही व्हेरिएंट 2 किलोवॅट, 3 किलोवॅट आणि 4 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह ऑफर केले  जाणार आहेत. सध्या Ola S1 Air मध्ये 4.5 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. Ola S1 Air चा टॉप स्पीड 85 kmph आहे. स्कूटरचे 2 किलोवॅट व्हेरिएंट सिंगल चार्ज केल्यानंतर 85 किमी धावू शकतात, तर 3 किलोवॅट आणि 4 किलोवॅट व्हेरिएंट एकदा चार्ज केल्यानंतर अनुक्रमे 125 किमी आणि 165 किमी पर्यंत धावतील.

- Advertisement -

दरम्यान, Ola S1 Air च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाल्यास S1 आणि S1 Pro प्रमाणेच ही स्कूटर बनवण्यात आली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर कोरल ग्लॅम, निओ मिंट, पोर्सलीन व्हाइट, जेट ब्लॅक आणि लिक्विड सिल्व्हर या 5 ड्युअल-टोन पेंट थीममध्ये उपलब्ध असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या ग्राहकांनी कंपनीच्या दिवाळी रिझर्व्हेशन विंडो दरम्यान S1 Air चे 2.5 kWh व्हेरिएंट बुक केले होते, त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 3 किलोवॅट व्हेरिएंटमध्ये अपग्रेड करून मिळणार असल्याचे ओला इलेक्ट्रिकने सांगितले आहे.

- Advertisment -