घरटेक-वेक'ओला' ला कोरोनाचा फटका; १४०० कर्मचाऱ्यांना काढणार

‘ओला’ ला कोरोनाचा फटका; १४०० कर्मचाऱ्यांना काढणार

Subscribe

कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात ओला कंपनीचं नुकसान झालं. यामुळे ओला कंपनी तब्बल १४०० कर्मचाऱ्यांना काढणार आहे.

ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा देणारी कंपनी ओला १४०० कर्मचार्‍यांना नोकरीवरुन काढणार आहे. ओलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश अग्रवाल यांनी स्वत: आपल्या कर्मचार्‍यांना ही माहिती दिली आहे. लॉकडाऊन अंशतः शिथिल केल्यानंतर ओलाने देशातील सुमारे १६० शहरांमध्ये पुन्हा सेवा सुरू केली आहे. देशभरात २५ मार्चपासून लॉकडाऊन लागू झाल्यानंतर ओलाची सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, कर्मचार्‍यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये अग्रवाल यांनी हे स्पष्ट केलं आहे की व्यवसायाचे भविष्य अत्यंत अस्पष्ट आणि अनिश्चित आहे. निश्चितच या संकटाचा परिणाम आपल्यावर बर्‍याच काळासाठी होईल. भावेश अग्रवाल यांनी मेलमध्ये सांगितलं आहे की उद्योगावर विषाणूचा खूप वाईट परिणाम झाला आहे. गेल्या दोन महिन्यांत आमची कमाई ९५ टक्क्यांनी घटली आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे या संकटाचा परिणाम आमच्या कोट्यवधी वाहनचालक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनावर झाला आहे. यामुळेच कंपनीने १,४०० कर्मचार्‍यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

उबरने ३००० हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरुन काढलं

यापूर्वी ओलाचा प्रतिस्पर्धी उबरनेही कोविड-१९ साथीच्या रोगामुळे जगभरात ३००० हून अधिक कर्मचार्‍यांना कामावरुन काढणार असल्याची घोषणा केली होती. अलीकडेच अमेरिकेची कंपनी उबरने यूएस सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज कमिशनला (एसईसी) याबाबतचं कारण सांगितलं होतं. “कोरोना विषाणूमुळे आर्थिक आव्हाने, अनिश्चितता आणि उद्भवणार्‍या व्यवसायावर होणारा परिणाम यामुळे कंपनीचा ऑपरेटिंग खर्च कमी करण्याची योजना आखण्यात आली आहे,” असं उबेरने म्हटलं होतं.


हेही वाचा – दिलासादायक: रिकवरी रेट ३९.६२ टक्के; इतर देशांपेक्षा चांगली स्थिती – आरोग्य मंत्रालय

- Advertisement -

स्विगी-झोमॅटो कर्मचाऱ्यांना काढणार

यापूर्वी ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी स्विगी आणि झोमॅटो कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची घोषणा केली होती. येत्या काही दिवसांत स्विगी जवळपास १,१०० कर्मचार्‍यांना काढणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -