Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश वृद्धेचा पेन्शनसाठी बँकेपर्यंत अनवाणी प्रवास; अर्थमंत्र्यांनी एसबीआयवर ओढले ताशेरे

वृद्धेचा पेन्शनसाठी बँकेपर्यंत अनवाणी प्रवास; अर्थमंत्र्यांनी एसबीआयवर ओढले ताशेरे

Subscribe

नवी दिल्ली : एक 70 वर्षीय वृद्ध महिला पेन्शनचे पैसे घेण्यासाठी खुर्चीच्या मदतीने भर उन्हात अनेक किलोमीटर अनवाणी पायी चालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा व्हिडीओ शेअर करताना महिलांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) वर ताशेरे ओढले आहेत. बँकेनेही आपल्या वतीने अर्थमंत्र्यांना उत्तर दिले आहे.

ही घटना 17 एप्रिलची ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या वृद्ध महिलेचे नाव सूर्या हरिजन असे आहे. तिचा मोठा मुलगा दुसऱ्या राज्यात परप्रांतीय मजूर असून ती तिच्या लहान मुलासोबत राहते. हा लहान मुलगा इतर लोकांच्या गुरांना चरण्याचे काम करतो आणि कुटुंबाकडे स्वत:च्या मालकीची कोणतीही जमीन नसून ते झोपडीत राहतात.

- Advertisement -

सीतारामन यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या व्यवस्थापकाने या व्हिडीओ प्रकरणी उत्तर दिले असले तरी आर्थिक सेवा विभाग (DFS) आणि SBI ने अशा प्रकरणांमध्ये दखल घ्यावी अशी त्यांची इच्छा असून लोकांशी मानवतेने वागण्याची त्यांची अपेक्षा आहे.” त्या भागात बँक मित्र नाहीत का?, असा प्रश्न सीतारामन यांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणावर अर्थमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर एसबीआयने ट्विट केले की, “व्हिडिओ पाहून आम्हालाही खूप दु:ख झाले आहे. सूर्या हरिजन दर महिन्याला त्यांच्या गावात CSP मधून पेन्शन काढतात. वृद्धापकाळामुळे त्यांच्या बोटांचे ठसे जुळत नाहीत. मात्र या घटनेनंतर आम्ही घरोघरी पेन्शन वितरणाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लवकरच त्यांना व्हीलचेअर पेन्शनची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.

एसबीआयने असेही सांगितले की, सूर्या हरिजन तिच्या नातेवाईकासोबत आमच्या झारीगाव शाखेत गेली होती. आमच्या शाखा व्यवस्थापकाने त्यांच्या खात्यात मॅन्युअली डेबिट करून पेन्शन रक्कम त्वरित भरली आहे. आमच्या शाखा व्यवस्थापकाने असेही सांगितले आहे की, पुढील महिन्यापासून त्यांची पेन्शन त्यांच्या घरी पोहोचवली जाईल.

- Advertisment -