घरदेश-विदेशमहागड्या पेट्रोल-डिझेलला आला पर्याय! रस्त्यावर धावणार हायड्रोजनच्या बस

महागड्या पेट्रोल-डिझेलला आला पर्याय! रस्त्यावर धावणार हायड्रोजनच्या बस

Subscribe

तुम्हाला सुखावणारी एक बातमी आहे. महागड्या पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून रस्त्यावर लवकरच हायड्रोजनच्या बस धावताना दिसणार आहेत.

हल्ली पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल महाग होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कच्च्या तेलाचे गगनाला भिडलेले भाव. अशा परिस्थितीत तुम्हाला सुखावणारी एक बातमी आहे. महागड्या पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून रस्त्यावर लवकरच हायड्रोजनच्या बस धावताना दिसणार आहेत. OGL म्हणजेच Olectra Greentech Limited, MEIL ची सहाय्यक कंपनी म्हणजेच Megha Engineering & Infrastructure Limited ने आपल्या पहिल्या हायड्रोजन बसचे अनावरण केलंय.

ओलेक्ट्रा कंपनीने ही हायड्रोजन बस बाजारात आणण्यासाठी रिलायन्ससोबत हातमिळवणी केली आहे. नैसर्गिक संसाधनांची कमतरता आणि वातावरणातील वाढत्या वायू प्रदूषण आणि उत्सर्जनाचे नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन Olectra ने हायड्रोजनवर चालणाऱ्या बस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

- Advertisement -

हायड्रोजन बसचे अनावरण करताना कंपनी वर्षभरात ही बस व्यावसायिकरित्या बाजारात आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या १२ मीटर लो फ्लोअर बसमध्ये कस्टमाइज्ड सीटिंग कॅपेसिटी उपलब्ध आहे, या बसमध्ये ३२ ते ४९ प्रवासी प्रवास करू शकतील इतकी जागा देण्यात येणार आहे. याशिवाय चालकासाठी स्वतंत्र सीट देण्यात आली आहे.

ऑलेक्ट्रा कंपनीच्या या उपक्रमामुळे भारत सरकारची कार्बन मुक्त हायड्रोजन महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. हायड्रोजन बसेसच्या माध्यमातून पर्यावरण स्वच्छ करण्याचा ऑलेक्ट्राचा उद्देश आहे. एकदा पूर्ण हायड्रोजन भरल्यानंतर ही बस जवळपास ४०० किलोमीटरचा प्रवास करू शकते.

- Advertisement -

जेव्हा उत्सर्जनाचा विचार केला जातो तेव्हा ही हायड्रोजन बस टेलपाइप उत्सर्जनाच्या स्वरूपात फक्त पाणी निर्माण करते. या बसची ही सर्वात महत्वाची आणि खास गोष्ट आहे. ही बस जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांना ग्रीन बसने बदलण्यास मदत करेल. कंपनीने या हायड्रोजन बसमध्ये टाइप ४ हायड्रोजन सिलिंडर दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -