नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून INDIA आणि भारत या शब्दांवरून वाद सुरू आहे. त्यामुळे लवकरच देशाला इंडिया नाही तर फक्त भारत बोलावे लागणार असे सांगण्यात येत आहे. या प्रकरणावरून आता विविध तर्क वितर्क लढविण्यात येत आहेत. विरोधकांनी तर या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. विरोधकांनी त्यांच्या आघाडीचे नाव INDIA असे ठेवल्याने सत्ताधाऱ्यांकडून असा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या वादमध्ये आता नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही उडी घेतलेली आहे. देशाच्या पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नाव बदलून दाखावावे, असे आव्हानच उमर अब्दुल्ला यांच्याकडून करण्यात आले आहे. (Omar Abdullah challenge to PM Narendra Modi over India vs BHARAT name dispute)
हेही वाचा – सरकार आपल्या दारी अन् दुष्काळ उरावरी; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
प्रसार माध्यमांनी उमर अब्दुल्ला यांना या प्रकरणावरून प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, त्यांच्याकडे संसदेत दोन तृतियांश बहुमत आहे का? जर असेल, तर त्यांनी नाव बदलावे. देशाचे नाव बदलणे ही काही क्षुल्लक बाब नाही. एवढी हिंमत असेल तर नावात बदल करावा, यात तुम्हाला कोण मदत करते तेही पाहू. आपल्या देशाच्या संविधानात अगदी सुरुवातीलाच लिहिले आहे की, इंडिया म्हणजे भारत म्हणजे देशाचे संघटन. त्यामुळे भाजप किंवा पंतप्रधानांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या देशाचे नाव बदलून दाखवावे’, असे आव्हान त्यांनी केले आहे.
#WATCH | On the India/Bharat debate, National Conference leader Omar Abdullah says “Nobody can change it… It is not so easy to change the name of the country. To do this, you will have to change the Constitution of the country. If you have the guts, then do it, we will also see… pic.twitter.com/ogKZ6VkAAN
— ANI (@ANI) September 8, 2023
काय आहे प्रकरण?
राष्ट्रपती भवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिकेबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दावा करत म्हटले होते की, राष्ट्रपती भवनात आज 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रात इंडियाचे राष्ट्रपती असे लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिले आहे. त्यांनी त्यांच्या X हँडलद्वारे लिहिले की, ‘ ही बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरसाठी ‘इंडियाचे राष्ट्रपती’ ऐवजी ‘भारताच्या राष्ट्रपती’च्या नावाने आमंत्रणे पाठवली आहेत.