Saturday, March 22, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशOmar Abdullah On Kejriwal : जम्मू - काश्मीरच्या जनतेचे भले करायचे..., काय म्हणाले ओमर अब्दुल्ला

Omar Abdullah On Kejriwal : जम्मू – काश्मीरच्या जनतेचे भले करायचे…, काय म्हणाले ओमर अब्दुल्ला

Subscribe

जम्मू - काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. कोणत्याही वादाशिवाय तुम्ही केंद्र सरकारसोबत कसे काम करता, असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते बोलत होते.

Omar Abdullah On Kejriwal : श्रीनगर : जम्मू – काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे. कोणत्याही वादाशिवाय तुम्ही केंद्र सरकारसोबत कसे काम करता, असा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा ते बोलत होते. जर केंद्र सरकारसोबत जुळवून घेतले नाही तर मग केजरीवाल यांना ज्याप्रमाणे पराभवाचा सामना करावा लागला तशाच परिणामांना तोंड द्यायला तयार राहावे लागेल. जम्मू – काश्मीरच्या जनतेचे भले करायचे असेल तर केंद्र सरकार सोबत जुळवून घेऊन काम करावे लागेल, असेही अब्दुल्ला म्हणाले. (omar abdullah on working with union government arvind kejriwal news)

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित अब्दुल्ला म्हणाले की, भाजप हा आमचा राजकीय शत्रू आहे. त्यांच्या कामांशी आम्ही असहमत आहोत, आणि यासाठी आमचा विरोध कायम राहील. आम्ही इंडि आघाडीचे सदस्य आहोत आणि जोवर आम्ही याचा भाग आहोत, तोवर हे असेच राहील, असेही त्यांनी सांगितले. मात्र, जेव्हा जम्मू – काश्मीरमधील जनतेच्या विकासाचा, भल्याचा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला एकत्र मिळूनच काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मी ज्या पदावर आहे, त्या पदावर राहून मला जम्मू – काश्मीरच्या जनतेसाठी काम करायचे आहे. मी काही चुकीचे करतोय असे जर लोकांना वाटत असेल तर त्यांनी निर्णय देण्यासाठी थोडा वेळ घ्यावा. आणि तरीही जर त्यांना असे वाटत असेल की जम्मू – काश्मीर आणि केंद्र सरकारचे संबंध तणावाचे असावेत तर मग आपली स्थिती केजरीवालांसारखी होईल. मग तुम्हाला केजरीवालांप्रमाणे पराभवाला तोंड द्यावे लागेल, आणि त्याची तयारी देखील ठेवावी लागेल, असेही अब्दुल्ला यांना सांगितले.

हेही वाचा – Delhi stampede : 200 मृत्यूचा पुरावा काय? न्यायालयाने चेंगराचेंगशी संबंधित याचिका फेटाळली

जनतेच्या भल्यासाठी निर्णय घेणे म्हणजे केंद्र सरकारसोबत तह करणे नाही. केंद्र सरकारच्या काही गोष्टींना आमचा विरोधच आहे. वक्फ बिल सुधारणा कायद्याला आमचा विरोधा आहे. पण जर जम्मू – काश्मीरमध्ये आम्ही करत असलेल्या कामाचे केंद्र सरकार समर्थन करत असेल. आमच्या कामात अडथळा आणत नसेल, कोणतेही अर्थसहाय्य अडवत नसेल तर त्यांच्याशी वाद घालणे म्हणजे मूर्खपणाच असेल, असे अब्दुल्ला म्हणाले.

पण जर उद्या त्यांची भूमिका बदलली तर आम्हाला देखील आमच्या भूमिकेचा विचार करावा लागेल. पण, सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याशी जाऊन वाद घालण्याचे कोणतेही कारण मला समोर दिसत नाही.

दिल्ली विधानसभेत आप आणि कॉंग्रेसचा सडकून पराभव झाल्यानंतरही ओमर अब्दुल्ला भडकले होते. तेव्हाही त्यांनी कॉंग्रेस आणि आपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी अजून आपापसात भांडा असा उपरोधिक सल्ला कॉंग्रेस आणि आपला दिला होता.

हेही वाचा – Avalanche Badrinath Dham : ग्लेशियर तुटल्याने अपघात; 57 कामगार दबले तर 16 जणांना वाचविण्यात यश