अरे बापरे! धावत्या ट्रेन समोर महिलेला दिला धक्का अन् म्हणाला…

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वायर मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने चक्का 40 वर्षाच्या आशियाई महिलेला ट्रेनसमोर ढकलले. या धावत्या ट्रेनला धडकून या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 61 वर्षीय सायमन मार्शल असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर खुनाचा आरोप आहे. घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर तासाभरातच त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले.

OMG He pushed the woman in front of the running train and said ...
अरे बापरे! धावत्या ट्रेन समोर महिलेला दिला धक्का अन् म्हणाला...

न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वायर मेट्रो स्टेशनवर एका व्यक्तीने चक्क 40 वर्षाच्या आशियाई महिलेला ट्रेनसमोर ढकलले. या धावत्या ट्रेनला धडकून या महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 61 वर्षीय सायमन मार्शल असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर खुनाचा आरोप लावण्यात आला आहे. घटनास्थळावरून पळून गेल्यानंतर तासाभरातच त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, घटनेतील  ही महिला मॅनहॅटनच्या अप्पर वेस्ट साइडमध्ये राहणारी मिशेल एलिसा गो प्लॅटफॉर्मवर ट्रेन येण्याची वाट पाहत उभी होती. त्यानंतर तिला अचानक पाठीमागून ढकलण्यात आल्याने ती ट्रेनच्या रुळांवर पडली आणि समोरून येणाऱ्या ट्रेनला धडकली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली.


महिला बेशुद्ध अवस्थेत असून, ती जखमी झाली होती.मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी सायमन मार्शल मानसिक आजाराने त्रस्त आहे. आरोपीने दावा केला की मिशेलने त्याचे जॅकेट चोरले म्हणून त्याने तिला ढकलले. आरोपीचा गुन्हेगारी रेकॉर्ड हा मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीदेखील दरोड्याच्या गुन्ह्यात त्याला दोन वर्षांची शिक्षा झाली होती. ऑगस्ट 2021 मध्ये त्याची तुरुंगातून सुटका झाली.

एका गुन्हाप्रकरणी या आरोपीची चौकशी करताना तो म्हणाला, जेव्हा त्यांना विचारले की त्यानेच एलिसाची हत्या केली होती का? मार्शलने उत्तर दिले, होय मी त्याला मारले. मी देव आहे, मी हे करू शकतो. हे उत्तर ऐकून पोलिस थक्क झाले.एका वृत्तानुसार,मृत महिलेला हे दिसत नव्हते की कोणीतरी तिच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे आणि म्हणून ती स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काहीही करू शकली नाही. याशिवाय ही घटना इतकी वेगाने घडली की, कोणालाही त्या महिलेला वाचवता आले नाही.


हेही वाचा – लेजेंड्स क्रिकेट लीगसाठी भारतीय संघाची घोषणा, सेहवाग हरभजन आणि युवराजला संधी