घरट्रेंडिंगअरे बापरे ! क्रॅश होता होता वाचले ब्रिटिश एयरवेजचे विमान, VIDEO पाहून...

अरे बापरे ! क्रॅश होता होता वाचले ब्रिटिश एयरवेजचे विमान, VIDEO पाहून अंगावर काटाच येईल

Subscribe

विमान लॅंडिंगसाठी जमिनीच्या जवळ पोहोचले. मात्र, विमानाला ब्रेक लागून सुरक्षितरित्या लॅंडिंग होणार तेवढ्यात एक थरारक प्रकार घडला ते पाहून तुमच्या अंगावर काटाच येईल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

नेहमीप्रमाणेच ब्रिटीश एयरवेजचे विमान जगातील सर्वात व्यस्त असलेल्या ब्रिटनच्या हिथ्रो विमानतळावर लँडिंग करत होते. विमानाच्या लॅंडिंगसाठी पायलटने प्रक्रियेला सुरुवात केली. विमान लॅंडिंगसाठी जमिनीच्या जवळ पोहोचले. मात्र, विमानाला ब्रेक लागून सुरक्षितरित्या लॅंडिंग होणार तेवढ्यात एक थरारक प्रकार घडला ते पाहून तुमच्या अंगावर काटाच येईल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

हे विमान लॅंण्ड होत असताना जोरदार वारे घोंघावत होते. विमान ज्याक्षणी जमिनीला टेकत होत तेव्हा वेगवान वाऱ्याच्या झोतामुळे ते एका बाजूला कलले गेले. या विमानाच्या उजव्या बाजूच्या पंख्याची बाजू वर झाली आणि हे विमान डाव्या बाजूला कलले गेले. मात्र, विमानाच्या पायलटने प्रसंगावधान राखत त्याने आपला निर्णय बदलला. त्याने हे विमान पुन्हा हवेत उडवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.

- Advertisement -

ब्रिटिश एअरवेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्व वैमानिक उच्च प्रशिक्षित आहेत आणि खराब हवामान आणि परिस्थितीच्या बाबतीत ते विमान हाताळू शकतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सर्व प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. युजर्स पायलटचे कौतुक करत आहेत.

- Advertisement -

हे ही वाचा – भारतात तीन डोस असलेल्या Zydus Cadila लसीचा पुरवठा सुरु; सुईशिवाय मिळणार लस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -