Omicron Variant: आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रॉन मंदावला, पण अमेरिकेत ८ लाख जणांचा मृत्यू!

omicron cases declining in African countries and 8 lakh people died in America
Omicron Variant: आफ्रिकन देशांमध्ये ओमिक्रॉन मंदावला, पण अमेरिकेत ८ लाख जणांचा मृत्यू!

जगभरात कोरोनासह ओमिक्रॉनचे संकट गडद होताना दिसत आहे. अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या केसेस खूप झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. आफ्रिकन देशांमध्ये जरी ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव मंदावला असला तरी, अमेरिका, ब्रिटनच्या देशांमध्ये ओमिक्रॉनने भयानक रुप धारण केले आहे. अमेरिकत ८ लाख जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच अमेरिकेत गेल्या वर्षीच्या रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याच्या प्रमाणापेक्षा अधिक रुग्ण अमेरिकेत रुग्णालयात दाखल होत आहेत.

अमेरिका आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या (U.S. Department of Health and Human Services) आकड्यांनुसार, रविवारपर्यंत १ लाख ४२ हजार ३८८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जी गेल्या वर्षी १४ जानेवारीला नोंद केलेल्या १ लाख ४२ हजार ३१५ एक दिवसांच्या रुग्णसंख्येपेक्षा खूप अधिक आहे. तसेच त्यावेळेस सरासरी आठवड्यात दिवसाला रुग्णालयात दाखल होण्याची संख्या १ लाख ३२ हजार ८६ होती, जी दोन आठवड्यापूर्वीच्या तुलनेत एकूण ८३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आफ्रिकेत कमी होतायत कोरोना केसेस

साऊथ आफ्रिकेतील (South Africa) कोरोना केसेसबाबत बोलताना जागतिक आरोग्य संघटना म्हणाली की, महाद्वीपवर महामारी सुरू झाल्यानंतर यावेळी रुग्णांच्या संख्येत कमी आली आहे. आकड्यांनुसार आफ्रिकेत एकूण कोरोना केसेस १०.२ मिलियनहून अधिक झाल्या आहेत. तिथे बाधित नोंद झालेल्या केसेसमध्ये आढळले आहे की, आठवड्याची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत ९ जानेवारीपर्यंत सात दिवस स्थिर होती.

आफ्रिकेमधील जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय संचालक मात्शिदिसो मोएती म्हणाले की, सुरुवातीचे इशारे सांगतात की, आफ्रिकेची चौथी लाट वेगाने आणि संक्षिप्त होती. परंतु अस्थिर नाही. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत महामारीच्या लाटेत बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसले, परंतु गेल्या आठवड्यात संसर्गाच्या केसेसमध्ये १४ टक्के घट झाली. तसेच जिथे ओमिक्रॉनच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली त्या दक्षिण आफ्रिकेत साप्ताहिक संसर्गामध्ये ९ टक्क्यांनी घट झाली आहे.


हेही वाचा – Corona In India: देशात रुग्णसंख्या वाढीचा वेग कायम! २४ तासांत २,६८,८३३ नव्या रुग्णांची भर, पॉझिटिव्हिटी रेट १६.६६ टक्क्यांवर