घरताज्या घडामोडीOmicron Variant: देशात ओमिक्रॉनचा विस्फोट; २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग; एकूण रुग्णसंख्या ७८१वर!

Omicron Variant: देशात ओमिक्रॉनचा विस्फोट; २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग; एकूण रुग्णसंख्या ७८१वर!

Subscribe

देशात ओमिक्रॉनचा प्रसार दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातील २१ राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार झाला आहे. गेल्या २४ तासांत देशात १२८ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ७८१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २४१ ओमिक्रॉनबाधित रुग्ण रिकव्हर झाले आहेत. सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण दिल्लीत आढळले आहेत.

- Advertisement -

तसेच देशात गेल्या २४ तासांत ९ हजार ९१५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशात सध्या ७७ हजार २ रुग्णांवर उपचार सुरू आहे. एकाबाजूला देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढत आहे. दिल्लीत सर्वाधिक २३८ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यलो अलर्ट जारी केला. तसेच शाळा, कॉलेज पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात पुन्हा कडक निर्बंध लागण्याची भीती सर्वत्र पसरली आहे.

कोण-कोणत्या राज्यांमध्ये किती ओमिक्रॉनबाधित आढळले?

दिल्ली – २३८ रुग्ण – ५७ रुग्ण रिकव्हर
महाराष्ट्र – १६७ रुग्ण – ७२ रुग्ण रिकव्हर
गुजरात – ७३ रुग्ण – १७ रुग्ण रिकव्हर
केरळ – ६५ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
तेलंगणा – ६२ रुग्ण – १० रुग्ण रिकव्हर
राजस्थान – ४६ रुग्ण – ३० रुग्ण रिकव्हर
कर्नाटक – ३४ रुग्ण – १८ रुग्ण रिकव्हर
तामिळनाडू – ३४ रुग्ण – १६ रुग्ण रिकव्हर
हरयाणा – १२ रुग्ण – २ रुग्ण रिकव्हर
पश्चिम बंगाल – ११ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
मध्यप्रदेश – ९ रुग्ण – ७ रुग्ण रिकव्हर
ओडिसा – ८ रुग्ण
आंध्र प्रदेश – ६ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
उत्तराखंड – ४ रुग्ण
चंदीगढ – ३ रुग्ण – २ रुग्ण रिकव्हर
जम्मू-काश्मीर – ३ रुग्ण – ३ रुग्ण रिकव्हर
उत्तर प्रदेश – २ रुग्ण – २ रुग्ण रिकव्हर
गोवा – १ रुग्ण
हिमाचल प्रदेश – १ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
लडाख – १ रुग्ण – १ रुग्ण रिकव्हर
मणिपूर – १ रुग्ण

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: राज्यात जानेवारी, फेब्रुवारीत Covid-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ अपेक्षित; खुद्द आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -